सेंद्रिय शेतीला गती देण्यासाठी राज्य सरकारने घेतला हा निर्णय

- Advertisement -

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच सेंद्रिय शेतीचे (Organic Farming) महत्व शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी विशेष कार्यक्रम घेतला होता. यावरुन लक्षात येते की, केंद्र सरकारने सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यासोबत राज्य सरकारनेही आता महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे सेंद्रिय शेतीला गती मिळणार आहे.

रासायनिक खतांचा वापर करुन सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढविण्यासाठी राज्य सरकारनेआपल्या कृषी विद्यापीठाकडे असलेल्या यंत्रणाचा आणि अनुभवी कृषितज्ञांचा सुयोग्य वापर करुन घेण्यासाठी कृती कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याच अनुशंगाने राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना सध्या केवळ सेंद्रिय शेतीला घेऊन कोणत्या गोष्टी पुरक आहेत यासंदर्भात अहवाल सादर करावे लागणार आहेत. सेंद्रिय शेतीचे निष्कर्ष त्याबाबतच्या सुचना देण्याचे महत्वाचे काम आता राज्यातील चार कृषी विद्यापीठांना करावे लागणार आहे. त्यामुळे योग्य सुचना आणि निष्कर्ष याबाबत विद्यापीठांना अहवाल सादर करण्याच्या सुचना देखील राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत. याकरिता राज्य सरकारने प्रति विद्यापीठास ५ कोटीचा निधी दिलेला आहे.

हे देखील वाचा