पुणे : साधारणपणे ऊसाची उंची पाच ते सात फूटच असते. पण एका प्रगतिशील शेतकर्याने शास्त्रोक्त पद्धतीने ऊस वाढवला की त्याच्या शेतातील ऊस सोळा फुटांपर्यंत पोहोचला. उसाची उंची वाढल्याने शेतकर्याचे उत्पन्नही दुप्पट होणे स्वाभाविक आहे. या शेतकर्याने असा प्रयोग केला की, ऊसाची उंची जवळपास तीनपट वाढली. इतर शेतकर्यांनीही ही पद्धत वापरली तर त्यांचा ऊसही एवढा वाढू शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. अगदी तसेच उत्तर प्रदेशही ऊसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. मेरठ येथील प्रगतिशील शेतकरी चंद्रहास यांनी त्यांच्या शेतात नवीन प्रयोग करत तब्बल १६ फुटी ऊसाचे उत्पादन घेतले आहे. या शेतकर्याने ऊस पिकवण्यासाठी खंदक पद्धतीचा वापर केला. यामुळे उसाची मुळे खोलवर गेली आणि त्याची उंचीही वाढली. चंद्रहास आपल्या शेतातील उसालाही बांधत नाही. ते फक्त ट्रेंच पद्धत वापरतात.
ऊसाची लांबी वाढवून शेतकरी चंद्रहास आपले उत्पन्न दुप्पट करत असताना जयसिंगपूर गावातील महिलाही उसाची गुणवत्ता वाढवण्यात महत्त्वाचे योगदान देत आहेत. या गावातील महिलांचा बचत गट आहे. या गटाच्या माध्यमातून महिला उसाचे बियाणे तयार करतात आणि निरोगी ऊस उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावतात. विक्रमी ऊसाचे उत्पादन घेण्यात या गुणवत्तापूर्ण बियाण्याचेही मोठे योगदान आहे.