चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वायगाव भोयर येथील एका शेतकर्याने सोयाबीनचे नवे वाण विकसित केले आहे. सुरेश बापुराव गरमडे असे या शेतकर्याचे नाव आहे. गरमडे यांनी शोधलेल्या सोयाबीनच्या वाणाला केंद्र सरकारच्या दिल्लीस्थित वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. हे वाण प्रतिकूल हवामानातही यलो मोझॅक रोगाला बळी पडत नसून एकरी १७ क्विंटल उत्पादन देते.
नव्या सोयाबीन वाणाची वैशिष्ट्ये :
१) एसबीजी-९९७ वाणाच्या झाडाची उंची ७५ सेंटीमीटरपर्यंत वाढते.
२) एका झाडाला १४० ते १५० शेंगा लागतात.
३) एकरी १७ क्विंटल उत्पादन देते.
४) हे वाण प्रतिकूल हवामानातही यलो मोझॅक रोगाला बळी पडत नाही.
५) इतर जातीच्या तुलनेत यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त आहे.
पेटंटसाठी सलग तीन वर्ष मागोवा
या वाणाचे पेटंट मिळवण्यासाठी गरमडे यांनी पुणे येथील पेटंट प्राधिकरण कार्यालयात प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर सलग तीन वर्ष सोयाबीन संशोधन केंद्रात या वाणाचा मागोवा घेण्यात आला होता. तिथे सुद्धा हे वाण सरस आणि वेगळे आढळून आल्याने वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाने गरमडे यांना त्यांच्या जातीचे उत्पादन, विक्री, बाजार, वितरण, आयात किंवा निर्यात करण्याचा अधिकार दिले आहेत.
हे देखील वाचा :