पुणे : कृषी क्षेत्रात इस्त्रायलचे तंत्रज्ञान सर्वोत्तम मानले जाते. याच तंत्रज्ञानाचा वापर करुन एका शेतकर्याने केवळ ७ हेक्टरवर सेंद्रीय पध्दतीने शेती करत वर्षाला तब्बल १ कोटी रुपयांचे उत्पादन घेवून दाखविले आहे. यासाठी केहराराम चौधरी या शेतकर्यांने पारंपारिक पिकपध्दतीची चौकट तोडून त्याच्या शेतात नवा प्रयोग करण्याचे धाडस दाखविले व त्यात त्यांना मोठे यश मिळाले आहे. आता चौधरी यांना मिळालेले यश पााहून अनेक शेतकरी देखील तसा प्रयोग करु लागले आहेत.
राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात दाता गावातील शेतकरी केहराराम चौधरी यांनी गहू, बाजरी, मूग, मोठ, एरंड आणि रायडाच्या पारंपारिक लागवडीबरोबरच मेदजूल आणि बार्ही जातीच्या खजूरांची लागवड केली. ५ वर्षांपूर्वी ३५०० रुपये खर्चून दोन वेगवेगळ्या जातीच्या खजुरांची लागवड केली होती आणि ते ४ हेक्टर शेतात ही रोपे घेतली. आता अवघ्या काही वर्षांच्या देखरेखीनंतर शेतकर्यांच्या शेतात मेडजूल खजूरचे उत्पादन सुरू झाले आहे. खजुराच्या या जातीचे उत्पादन सेंद्रिय पद्धतीने केले जाते. म्हणजेच यामध्ये कोणतीही रासायनिक खते व खतांचा वापर केला जात नाही. शेणखत व गांडुळ खत वापरले जाते.
राज्यातील जालेर, बारमेर, चुरू, जैसलमेर, सिरोही, श्री गंगानगर, जोधपूर, हनुमानगड, नागौर, पाली, बिकानेर आणि झुंझुनू या १२ जिल्ह्यांमध्ये खजुराच्या या जातीचे उत्पादन केले जात आहे. खजूराचे मूळ उत्पादक आखाती देशांसारखे हवामान पाहता राज्य सरकार येथे खजूर लागवडीला प्रोत्साहन देत आहे. यासाठी शेतकर्यांना आयात व टिश्यू कल्चर तयार रोपे देण्याबरोबरच तांत्रिक सहाय्यही करण्यात येत आहे.
असे करा नियोजन
१) जुलै ते सप्टेंबर दरम्यान कोणत्याही प्रकारच्या जमिनीत रोपे लावता येतात.
२) एका रोपापासून दुसर्या रोपात आणि एका ओळीपासून दुसर्या ओळीत ८ मीटरचे अंतर असावे.
३) एक हेक्टर मध्ये १५६ झाडे लावता येतात.
राजस्थानमध्ये सध्या ६ जाती पेरल्या जात आहेत. यामध्ये ४ मादी व दोन नर जाती आहेत. मादी जाती- मेडजूल ३४३३ रुपये प्रति रोप, बार्ही २२३३ रुपये प्रति रोप, खालस २२३३ रुपये प्रति रोप आणि खुनईजी २१८३ रुपये प्रति रोप. नर जाती – अलाइन सिटी रु. २४३३ प्रति रोप आणि घनामी रु. २९३३ प्रति रोप प्रमाणे मिळते.