औरंगाबाद : दोन वर्षांपूर्वी सोयाबीनचा भाव अकरा हजार रुपयापर्यंत वाढला होता तो गतवर्षी घसरत साडेसात हजार व आता पाच हजारांच्या खाली आला आहे. हरभर्याला शासनाने हमीभाव जाहीर केला तरी बाजारपेठेत हमीभावाने हरभरा विकला जात नाही. त्यामुळे शेतकर्याला हमीभावापेक्षा कमी भावाने हरभरा विकावा लागतो आहे. यामुळे शेतकरी सोयाबीन व हरभर्याकडून पुन्हा एकदा ऊसाकडे वळण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील शेतकरी सोयाबीन, तूर व हरभरा हे नगदी पिके घेत होता आता ही पिके घेणे परवडनासे झाले आहे. कारण पिकाचा लागवडीचा खर्च, काढणीचा खर्च, फवारणी हा दरवर्षी वाढतो आहे व उत्पादकताही कमी होत आहे. त्यातुलनेत गेल्या काही वर्षांत ऊसाला चांगला भाव मिळतो आहे त्यामुळे गतवर्षी उसाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढले आता पुन्हा रब्बी हंगामापासून ऊस लागवडीचे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे.