• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यातील ५७ हजार शेतकरी पीएम किसान निधीपासून वंचित राहणार? हे आहे प्रमुख कारण

डॉ. युवराज परदेशी by डॉ. युवराज परदेशी
June 24, 2022 | 2:00 pm
in बातम्या
farmer-in-tension

नंदुरबार : पीएम किसान सन्मान निधी योजनेचे ११वा हप्ता वितरित झाला असून शेतकर्‍यांना लवकरच १२वा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. हा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना ई-केवायसी बंधनकारक आहे. पीएम किसान योजनेंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २४ हजार लाभार्थीची नोंदणी करण्यात आली आहे. मात्र यापैकी केवळ ६७ हजार शेतकर्‍यांनीच ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. यामुळे जिल्ह्यातील ५७ हजार शेतकरी पीएम किसान निधीपासून वंचित राहणार का? असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. PM Kisan Nandurbar District

ई-केवायसीसाठी शेतकर्‍यांना ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ती ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतरही तांत्रिक अडचणींमुळे ही मुदत आता ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आता ३१ जुलैपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावीच लागणार आहे. यानंतरच आता १२ वा हप्ता मिळणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांची ई-केवायसीची प्रक्रिया अद्यापही पूर्ण करण्यात आलेली नाही. जर शेतकर्‍यांना १२ व्या हफ्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वांनी तातडीने ई-केवासीची प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.
हे देखील वाचा: ‘ई-केवायसी’ची मुदत पुन्हा वाढवली, आता या तारखेपर्यंत करा प्रक्रिया पूर्ण

अशी पूर्ण करा ई-केवायसीची प्रक्रिया
eKYC करण्यासाठी www.pmkisan.gov.in या वेबसाईटवर गेल्यावर ‘Former Coerner’ वरील eKYC ला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आधार केवायसी नावाचे एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये सुरुवातीला आधार कार्ड क्रमांक त्यानंतर समोरच्या बॉक्समधील अक्षरे आणि अंक आहेत तसे टाकावेत. त्यानंतर search या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये सुरुवातीला आधार नंबर दिसेल त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे तोच येथे टाकावा. त्यानंतर Get Otp यावर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर OTP नंबर येईल तो OTP येथे submit करावा. त्यानंतर submit for Auth यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर EKYC is successful submitted असा एसएमएस दिसेल. याचाच अर्थ eKYC submitted यशस्वी झाला आहे. यादरम्यान invalid असा पर्याय समोर येत असेल तर काही दिवसांनी eKYC करायचे किंवा CSC केंद्रावर जाऊन कागदपत्रे जमा करून eKYC करून घ्यावे लागणार आहे.

डॉ. युवराज परदेशी

डॉ. युवराज परदेशी

ताज्या बातम्या

weather-updates-rain

Weather Alert : राज्यात पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा इशारा; ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी

June 26, 2022 | 9:11 am
devnarayan pashupalan awasiya yojana

गाई, म्हशींसाठी वसवले अत्याधुनिक शहर; मॉल, शाळा, रुग्णालयासह अनेक सुविधा

June 26, 2022 | 8:53 am
shen

शेणाची वर्षभरासाठी होतेय बुकिंग; ‘या’ कारणामुळे अचानक वाढले शेणाचे महत्व

June 25, 2022 | 10:36 am
kapus-cotton-market-rate

कापूस लागवडीआधी शेतकर्‍यांना सतावतेय ही चिंता; वाचा सविस्तर

June 25, 2022 | 8:30 am
cow

शेतकऱ्यांनो तुमचे पशुधन आजारी तर पडले नाही ना? असे तपासा

June 24, 2022 | 4:18 pm
fertilizer

‘लिंकिंग’मुळे शेतकरी त्रस्त

June 24, 2022 | 2:56 pm
  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group