पुणे : अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून मत्स्यपालन करतात. ज्यांच्याकडे मोठे शेततळे आहे. किंवा धरण, नदी, तलावासह अन्य जलसाठ्यांमध्ये मत्स्यपालनाचा प्रयोग केला जातो. मात्र आज आम्ही तुम्हाला पिंजर्यातील मत्स्यपालनाविषयी माहिती देणार आहोत.याला केज फिशिंग किंवा फिनफिश प्रोडक्शन म्हणतात, याशिवाय याला मॅरीकल्चर देखील म्हणतात. केज फार्मिंग तंत्राने मासे पालन करून तुम्ही दुप्पट नफा कमवू शकता.
मासळी बाजारपेठे खूप मोठी आहे. माशांना दिवसेंदिवस मागणी वाढत चालली आहे. शेतकर्यांनी शेतीसोबत मत्स्यपालन करावे, यासाठी सरकारतर्फे शेतकर्यांना मत्स्यपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदानही दिले जाते. पीएम मत्स्य संपदा योजनेअंतर्गत सरकार शेतकर्यांना सर्वतोपरी मदत करत आहे. माशांचा उपयोग केवळ खाण्यापुरता मर्यादित नसून बाजारात फिश ऑइलला खूप मागणी आहे. अनेक औषधींमध्येही याचा वापर केला जात असल्याने मत्स्यशेतीला भविष्यात अच्छे दिन येतील, यात शंका नाही.
असे करा पिंजर्यातील मत्स्यपालन
प्रथम, विविध प्रजातींच्या संगोपनासाठी पिंजरा बनवा. त्यांची लांबी, रुंदी, उंची सर्व समान असावे. या पिंजर्यात मत्स्यबीज टाका आणि पेटीभोवती समुद्री तण टाका. मग हा पिंजरा अशा ठिकाणी ठेवा. जेथे पाण्याचे स्त्रोत ५ मीटरपर्यंत खोल असावेत. पिंजर्यात मासे पाळण्यासाठी आपल्याला फार मोठ्या पाण्याच्या स्त्रोताची गरज नाही. यामध्ये मासे निरोगी आणि सुरक्षित राहतील येवढे पाणी पुरेसे असते. पिंजर्यासह लागवड केलेले समुद्री तण देखील बाजारात चांगल्या किंमतीत विकता येते.