• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

फ्युचर फार्मिंग शेतीबाबत काय म्हणाले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी; वाचा सविस्तर

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in बातम्या, Featured
March 5, 2022 | 12:51 pm
governor-bhagat-singh-koshyari-jain-hills

जळगाव : वाढत्या लोकसंख्येचा विचार केला असता कमी जागा, कमी पाण्यात चांगल्या गुणवत्तापूर्ण शेतमालाचे उत्पादन ही काळाची गरज ठरणार असून फ्युचर फार्मिंगमधील शेती नवीदृष्टी ठरू शकते अशी प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली. राज्यपालांनी जळगाव येथील जैन इरिगेशनच्या फ्युचर फार्मिंग (भविष्यदर्शी शेती) या प्रकल्पाला भेट दिली. जैन इरिगेशनच्या माध्यमातून कृषिक्षेत्रात शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य अव्दितिय असल्याचे राज्यपाल म्हणाले.

एरोपोनिक बटाटा या प्रयोगाची माहिती घेतली

राज्यपालांनी फ्युचर फार्मिंग लॅबमध्ये एरोपोनिक बटाटा या प्रयोगाची माहिती घेतली. या प्रयोगात भविष्याची अन्नाची वाढती गरज आणि नवतंत्रज्ञान यांचा सुरेख मेळ एरोपोनिक्स बटाटा प्रयोगात आहे. नैसर्गिक संसाधने सिमीत असतील व त्याउलट लोकसंख्या वाढलेली असेल त्या संसाधनांमध्ये अन्न धान्याच्या उत्पादनाला मर्यादा येणार आहे. आपण जमिनी, पाणी व अन्य निसर्गदत्त घटक वाढवू शकत नाही परंतु एरोपोनिक्स बटाटा यासारख्या नवतंत्राचा पुरेपूर उपयोग करून भविष्यात चांगला पर्याय उभा करू शकतो असे राज्यपाल जैनचे उच्च कृषितंत्रज्ञान समजावून घेताना म्हणाले.

या भेटी दरम्यानच्या प्रवासात त्यांनी भविष्यातील शेती (फ्युचर अॅग्रिकल्चर) येथे व्हर्टिकल फार्मिंग, मातीविना शेती, हायड्रोपोनिक्स शेती या सह भविष्यातील शेती याबाबतच्या तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. यासह त्यांनी विविध फळांच्या लागवड क्षेत्रांचीही पाहणी केली. ज्या परिसरात वॉटर युनिव्हसिटी उभारली जाणार आहे तो परिसर त्याची संकल्पना समजून घेतली. याबरोबरच जगातील सर्वात मोठ्या टिश्युकल्चर उत्पादन केंद्र म्हणून नावारुपास आलेल्या केळीच्या टिश्युकल्चर लॅब आणि प्रायमरी हार्डनिंग प्रकल्पास भेट दिली. या लॅबमध्ये तयार होणाऱ्या उत्पादनांची निर्मीती व थेट शेतकऱ्यांपर्यंत हे उच्च तंत्रज्ञान कसे पोहोचते याची माहिती त्यांनी जाणून घेतली. उच्च कृषी जैवतंत्रज्ञानाची ओळख करून घेण्यासाठी त्यांनी बायोटेक्नॉलॉजी लॅबचीही आवर्जून भेट घेतली. त्याबाबतची माहिती सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन व अतुल जैन, डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के. यादव, डॉ. अनिल पाटील, के. बी. पाटील यांनी करून दिली.

भविष्यातील काळाची पाऊले ओळखली

जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी भविष्यातील काळाची पाऊले ओळखून त्या दृष्टीने साकारलेल्या उच्च तंत्रज्ञान, फ्युचर फार्मिंग, माती विरहीत शेती, सॉईललेस मीडिया, व्हर्टिकल फार्मिंग, भाजीपाला, स्ट्रॉबेरी, पुदिना, खिरे काकड्या, हळद, आले, टोमॅटो, ब्रोकोली आदी प्रयोगांच्या ठिकाणी राज्यपाल्यांनी भेट देऊन मोठ्या उत्सुकतेने माहिती जाणून घेतली. यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन व अतुल जैन तसेच काही निवडक वरिष्ठ सहकारी देखील यावेळी उपस्थित होते.

हे देखील वाचा :

  • थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?
  • सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर
  • रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?
  • नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा
  • मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन
Tags: Future FarmingGovernor Bhagat Singh Koshyariफ्युचर फार्मिंगराज्यपाल भगतसिंह कोश्यारी
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
farmer-producer-company

शेतकरी उत्पादक कंपन्यांना मिळणार ऑनलाइन व्यवसाय परवाने; वाचा काय आहे योजना

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट