मुंबई : राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील ६२ तालुक्यातील २७१ ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर केली आहे. आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, पाच जुलै रोजी आचारसंहिता लागू होणार आहे. चार ऑगस्ट रोजी मतदान, तर पाच ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात यावी, असेही निवडणूक आयोगानं जिल्हाधिकार्यांना सांगितलेय. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल.या निवडणुकीदरम्यान कोरोना नियमांचं पालन करण्यात यावे, असेही परिपत्रकात म्हटले आहे.
कसा आहे निवडणूक कार्यक्रम
तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक – ५ जुलै २०२२
नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ – १२ जुलै २०२२ ते १९ जुलै २०२२ पर्यंत… वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत.
नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक – २० जुलै २०२२.
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक – २२ जुलै २०२२.
निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणार्या उमेदरांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक – २२ जुलै २०२२ (दुपारी तीन नंतर).
आवश्यक असल्यास मतदानाचा दिंनाक – ४ ऑगस्ट २०२२.
मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक – ५ ऑगस्ट २०२२.
कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायचीच्या निवडणुका
नाशिक – ४०
धुळे – ५२
जळगाव – २४
अहमदनगर – १५
पुणे – १९
सोलापूर – २५
सातारा – १०
सांगली – १
औरंगाबाद १६
जालना – २८
बीड – १३
लातूर -९
उस्मनाबाद – ११
परभणी – ३
बुलढाणा – ५