‘ड्रोन’च्या माध्यमातून किटकनाशक फवारणीसाठी कृषी मंत्रालयाच्या ‘या’ आहेत मार्गदर्शक सुचना

- Advertisement -

मुंबई : शेतात किटकनाशकांच्या औषध फवारणीसाठी ‘ड्रोन’ चा वापर केला जाऊ लागला आहे. मात्र, या अत्याधिनक प्रणालीचा वापर करीत असताना काय काळजी घ्यावी याबाबत कृषी मंत्रालयाकडून एक नियमावलीच जारी करण्यात आली आहे.

काय आहेत कृषी मंत्रालयाचे निर्देश?

ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करताना शेतकर्‍यांना केवळ मंजूर किटकनाशकांचाच वापर करावा लागणार आहे. त्यासाठीची उंची किती राहणार आणि प्रमाणदेखील निश्चित केले जाणार आहे. सुरक्षतेच्या दृष्टीने हवेतून फवारणी करण्यापूर्वी संबंधित ऑपरेटरला २४ तास आगोदर तेथील स्थानिकांना याची माहिती द्यावी लागणार आहे. ड्रोन चालवण्यासाठी संबंधित व्यक्तीला योग्य ते प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचेही कृषी मंत्रालयाने सुचवलेले आहे. याशिवाय त्याला किटकनाशकाचे परिणाम काय होणार आहे त्याचीही माहिती असणे गरजेचे आहे.

कृषी क्षेत्राशी संबंधितांकडूनही निर्णयाचे स्वागत

क्रॉपलाइफ इंडिया या कृषी उद्योग संघटनेने ड्रोन बाबतच्या नियमावलीचे स्वागत केले आहे. कृषी मंत्रालय, केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालय यांच्यामध्ये सखोल चर्चा झाल्यानंतर ही मार्गदर्शक तत्त्वे समोर आली आहेत. यामध्ये किटकनाशकांच्या फवारणी बरोबरच सुरक्षतेच्यादृष्टीने झालेला विचार करण्यात आला ही अभिमानाची बाब असल्याचे क्रॉपलाइफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्टित्वा सेन यांनी सांगितले.

हे देखील वाचा