नागपूर : शेतकऱ्यांना शेतातील पीकांचा अचूक पेरा व संभाव्य उत्पादनाचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने १५ ऑगस्ट पासून राज्यभरात ‘ई-पीक पाहणी’चा (e Pik Pahani App) उपक्रम राबवण्याचा निर्णय राज्य सरकारच्या महसूल विभागाने घेतला आहे. यामध्ये शेतातील पीकपेर्याची नोंद ही शेतकऱ्यांनाच मोबाईलवर करावी लागते. ही नोंदणी कशा प्रकारे करावी, याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
अशी करा नोंदणी
शेतकऱ्यांनी प्ले स्टोअर मधून ‘ई-पिक पाहणी’ (e Pik Pahani App) हे अॅप डाऊनलोड करुन घ्यायचे आहे. हे अॅप ओपन करुन नविन खातेदार नोंदणी करुन घ्यावयाची आहे. यामध्ये आपला जिल्हा, तालुका आणि गावाची निवड करयाची आहे. त्यानंतर खातेदारमध्ये पहिले नाव, मधले नाव, अडनांव आणि गट क्रमांक टाकायचा आहे. गट क्रमांक टाकल्यानंतर शेतकऱ्याला आपले नाव समोर येते. त्यानंतर खातेक्रमांक तपासून आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे जो पुन्हा बदलता येणार नाही. त्यानंतर मोबाईलवर चार अंकी पासवर्ड येईल तो कायम लक्षात ठेवावा लागणार आहे. कारण या अॅपमध्ये तोच पासवर्ड लागणार आहे जो एसएमएस द्वारे पाठवला जाईल. यानंतरच तुमची नोंदणी यशस्वी होणार आहे.
यानंतर अॅप हे पूर्णपणे बंद करुन चालू करायचे आहे. अॅप पुन्हा चालू केल्यानंतर पुन्हा तुम्हाला खातेदार म्हणजे तुमचे नाव निवडावे लागेल. मॅसेजद्वारे आलेला पासवर्ड येथे नमूद करायचा आहे. त्यानंतर पुढे जाऊन परीचयमध्ये खातेदाराचा फोटो अपलोड करायचा त्यानंतर दिलेली माहिती भरून सबमिट करायचे. त्यानंतर होममध्ये येऊन पिकाची माहिती नोंदवा असा एक फॅार्म येतो. यामध्ये खातेक्रमांक नंतर गट क्रमांक, जमिनीचे क्षेत्र हे हेक्टरमध्ये भरायचे यानंतर हंगाम निवडायचा म्हणजे रब्बी की संपूर्ण वर्ष ते निवडायचे. त्यानंतर पिक पेरणीसाठीचे क्षेत्र किती याचा उल्लेख करायचा आहे. त्यानंतर पिकाचा वर्ग यामध्ये जे आपलं पिक आहे तेच निवडायचे यातील वेगवेगळे प्रकारही असू शकतात. त्यानंतर दिलेल्या पर्यापैकी तुमचं कोणतं पिक ते निवडायचे आहे. पुन्हा त्या पिकाचे क्षेत्र भरायचे. त्यानंतर सिंचनाचे साधन काय आहे त्याचा उल्लेख करायचा त्यानंतर ठिबक पध्दती कशी आहे याची दिलेल्या पर्यातून निवड करायची.त्यानंतर पिक लागवडीची तारीख याची नोंद करायची. त्यानंतर कॅमेराचा पर्याय येईल यातून फोटो काढायचा आणि तो फॅार्म सबमिट करायचा आहे.
सबमिट झाल्यानंतर पुन्हा होमवर यायचं ही नोंदवलेली माहिती केवळ तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह झाली. ती बघायची असेल तर पुन्हा पिकाची माहिती नोंदवा याच्यावर क्लिक करायचे आहे. यामध्येही पिकाची माहिती यावर क्लिक करयाचे यामध्ये तुम्ही भरलेली माहिती दिसेल जी मोबाईलमध्ये सेव्ह झालेली असेल ही माहिती संबंधित सर्वरला पाठवण्यासाठी अपलोड या बटनाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आलेल्या दोन पर्यापैकी परिचय माहिती क्लिक करुन माहीती अपलोड झालेली पहायला मिळते त्याच प्रमाणे पिक माहितीवरती क्लिक करुन अपलोड करायचे आहेअशा प्रकारे ‘ई-पिकपाहणी’ या अॅपद्वारे आपल्याला पिकाची माहिती भरता येते.
‘ई-पीक पाहणी’चे असे आहेत फायदे
१)‘ई-पीक पाहणी’ या अॅपमुळे शेतकर्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद होणार आहे. यामुळे ना शेतकर्याचे नुकसान होणार आहे ना सरकारची फसवणूक.
२) या अॅपवरील नोंदीमुळे राज्यात, देशात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे याची अचूक आकडेवारी एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
३) पिकाच्या अचूक आकडेवारीमुळे उत्पादनाबद्दल अंदाज बांधता येतो. यावरुन भविष्यात बी-बियाणे लागणारे खत हे पण उपलब्ध करुन देता येणार आहे. शेतावरील गटावर झालेल्या पीक नोंदीचा फायदा हा देशात कीती क्षेत्रावर कीती ऊत्पन्न झाले हे सांगण्यासाठी देखील होणार आहे.
४) पिकाच्या छायाचित्रामुळे किती अक्षांश: आणि किती रेखाअंशावर कोणत्या पिकाचा पेरा झाला आहे हे समजले जाणार आहे.
५) एका मोबाईलहून २० शेतकर्यांच्या नोंदी करता येणार आहेत. प्रत्येक शेतकर्याकडे मोबाईल नसतो त्यामुळेच अशा प्रकारची सोय करण्यात आली आहे.