वाशिम : सगल १० दिवस पावसाची रिपरीप ही सुरु असल्याने शेतामधून पाण्याचा निचराही झालेला नाही. पेरणी झालेल्या क्षेत्रात पाणी साचून राहिल्याने पिके सडू लागली आहेत. अती पावसाचा पिकांच्या वाढीवर तर परिणाम होत आहेच पण उगवताच पावसाचा मारा झाल्याने पिके ही कुजली आहेत. आगोदर पावसाअभावी दुबार पेरणी आणि आता अतिवृष्टीमुळे तिबार पेरणीचे संकट शेतकर्यांवर ओढावले आहे.
वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान सोयाबीन पिकाचेच झाले आहे. कडधान्य पेरणीसाठी उशिर झाल्याने शेतकर्यांना उडीद, मूगाला बाजूला सारत सोयाबीनवरच भर दिला होता. आता त्याचेही नुकसान होत असल्याने खरिपाचे नियोजनच बिघडले आहे. अतिवृष्टीमुळे तिबार पेरणीचे संकट ओढावले असून शेतकर्यांवर आर्थिक भार वाढणार आहे.