नाशिक : महिनाभरापासून थंडीचे कडाका कायम असल्याने रब्बी हंगामातील ज्वारी, मका, हरभरा या पिकांची पेरणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सध्याचे वातावरण रब्बी हंगामावाठी पोषक असल्याने शेतशिवार डोलत आहे. मात्र त्याचवेळी या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. आधीच खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकडून खूप अपेक्षा आहेत. मात्र या अपेक्षांवर लष्करी किडीचा प्रादूर्भात होतांना दिसत आहे. यामुळे आज आपण लष्करी अळीचे व्यवस्थापन कसे करायचे? याची सविस्तर माहिती घेणार आहोत.
रब्बी हंगामातील मका आणि ज्वारी ही पोषक वातावरणामुळे बहरात आहेत. मात्र, अधून मधून होणार्या वातावरणातील बदलांमुळे काही ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी वेळीच इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के, एसजी ग्रॅम ६ किंवा थायमिथॉक्झाम १२.६ टक्के अधिक लॅमडा साहलोथ्रीन ९.५ टक्के झेडसी संयुक्त कीटकनाशक ५ मिली किंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी, ४ मिली किंवा स्पायनोटोरम ११.७ एस सी, ५ प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
बहुतांश ठिकाणी रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी १५ जानेवारी पर्यंत उन्हाळी सोयाबीनचा पेरा केला तर फायद्याचे राहणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. पेरणीपूर्वी बियाणास ३ ग्रॅम कार्बोक्सीन अधिक थायरम ३७.५ टक्के किंवा पेनफ्लुफेन १३.२८ टक्के, १ मिली किंवा थायोफिनेट मिथाईल अधिक पायरेाक्लोस्ट्रोबिन ३ मिली प्रति किलो बियाणे या बुरशीनाशकाची फवारणी करावी. त्यामुळे पेरणीनंतर सोयाबीन बहरात येईपर्यंत कोणत्या कीडीचा प्रादुर्भाव होणार नाही.
हे देखील वाचा :