नंदुरबार : नंदुरबारची बाजारपेठ ही मिरचीसाठी संपूर्ण देशात प्रसिध्द आहे. येथील मिरचीला थेट परदेशातही मोठी मागणी असते. यंदा पोषक वातावरणामुळे नंदुरबार जिल्ह्यासह परिसरात लाल मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. गत दोन-तीन दिवसांपासून नंदुरबारच्या बाजारपेठेत (Nandurbar Red Chilli Market) मिरचीची आवक वाढली आहे. मिरचीची खरेदी झाल्यानंतर ओल्या मिरच्या वाळविण्यासाठी एका मोठ्या मोकळ्या जागेत ठेवल्या जातात त्यास पाथरी असे म्हणतात. सध्या नंदुरबारला लांबलांबपर्यंत लाल ओल्या मिरच्या वाळविण्यासाठी ठेवण्यात आल्या असल्याने संपूर्ण परिसात लाल गालिचा पसरला असल्याचे चित्र दिसून येते.
नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. येथे मिरचीची मोठी बाजारपेठ असल्याने गुजरात आणि मध्यप्रदेश येथील शेतकरीही मिरची विक्रीसाठी नंदुरबारलाच पसंती देतात. या हंगामात आतापर्यंत तर विक्रमी आवक झालेली आहे. बाजारपेठेतील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, हंगामाची सुरवात झाल्यापासून आतापर्यंत सुमारे ७ हजार वाहनांतून मिरचीची आवक झाली आहे. बाजार समितीच्या माध्यमातून १ लाख २५ हजार क्विंटलची खरेदी झाली आहे. आवक वाढूनही ४ हजार रुपये क्विंटलला दर मिळत आहे. यामुळे शेतकरी देखील खुश आहेत.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरची वाळवण्यासाठी जी विशेष सोय करण्यात आली त्याला पथारी असे म्हटले जात आहे. या ठिकाणी ओल्या मिरच्या ह्या वाळवल्या जातात. मात्र, आता मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने या ठिकाणी देखील वाहनांची पार्किंग केली जात आहे. बाजारपेठेत दाखल होणार्या वाहनांना उभे राहण्यासही जागा कमी पडत आहे. त्यामुळे मिरची पाथरीवरही वाहनांच्या रांगा आहेतच.
टोमॅटो पिकावरील कीड व रोगांचे व्यवस्थापन
करडई लागवडीचे सुधारीत तंत्रज्ञान, असे घ्या जास्त उत्पादन
वाटाणा लागवडीसाठी हे तंत्रज्ञान वापरा अन् बंपर उत्पादन मिळवा
शेतकर्यांनो ऊस लागवडीपूर्वी हे गणित समजून घ्या, अन्यथा होवू शकतो मनस्ताप
कोथिंबीरच्या बंपर उत्पादनासाठी अशा पध्दतीने करा लागवड
उन्हाळी कांदा लागवडीसाठी तज्ञांचा ‘हा’ आहे सल्ला
गेल्या तीन दिवसातला लाल मिरचीचा बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
दोंडाईचा | — | क्विंटल | 36 | 3799 | 5651 | 4500 |
नागपूर | लोकल | क्विंटल | 588 | 6000 | 12000 | 10500 |
दोंडाईचा | ओली | क्विंटल | 349 | 1300 | 3700 | 2901 |
24/12/2021 | ||||||
नंदूरबार | हायब्रीड | क्विंटल | 61 | 6000 | 10168 | 10000 |
भिवापूर | हायब्रीड | क्विंटल | 43 | 7000 | 12000 | 9500 |
सोलापूर | लोकल | क्विंटल | 39 | 2500 | 17300 | 10100 |
मुंबई | लोकल | क्विंटल | 227 | 10000 | 25000 | 17500 |
खामगाव | लोकल | क्विंटल | 2 | 3000 | 7100 | 5050 |
नंदूरबार | ओली | क्विंटल | 3724 | 2500 | 4000 | 3600 |
23/12/2021 | ||||||
अहमदनगर | — | क्विंटल | 26 | 5430 | 6790 | 6110 |
दोंडाईचा | — | क्विंटल | 13 | 4000 | 6601 | 5000 |
नंदूरबार | हायब्रीड | क्विंटल | 2 | 5900 | 10000 | 10000 |
सोलापूर | लोकल | क्विंटल | 28 | 2500 | 13901 | 9100 |
मुंबई | लोकल | क्विंटल | 259 | 10000 | 25000 | 17500 |
शिरपूर | पांडी | क्विंटल | 5 | 2569 | 2569 | 2569 |
दोंडाईचा | ओली | क्विंटल | 119 | 2100 | 3900 | 3000 |
नंदूरबार | ओली | क्विंटल | 2202 | 2800 | 4650 | 3720 |