पुणे : जर तुम्हाला तुमच्या जमिनीचे किंवा शेताचे मोजमाप करायचे असेल तर तुम्ही हे काम मोबाईलद्वारे पूर्ण करू शकता. तुम्हा सर्वांना माहित आहे की आजच्या काळात प्रत्येकाकडे मोबाईल आहे, ज्याद्वारे तुम्ही अनेक कामे सहज पूर्ण करू शकता. याच मोबाईलच्या सहाय्याने जमीनीचे मोजमाप कसे करायचे? याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. अनेकदा असे घडते की जेव्हाही आपल्याला आपल्या जमिनीचे किंवा शेताचे मोजमाप करायचे असते तेव्हा त्यासाठी पटवारीकडे जावे लागते, परंतु मोबाईलवरून जमीन मोजण्याचा हा सोपा मार्ग अनेकांना माहित नसतो. या दृष्टीने आज आपण नवीन माहिती जाणून घेवूयात.
यासाठी तुमच्याकडे स्मार्टफोन असला पाहिजे. या स्मार्टफोन मधील प्लेस्टोअर वरुन तुम्हाला जमीन किंवा शेत मोजण्यासाठी अॅप डाउनलोड करावे लागेल. आपण जीपीएस एरिया कॅल्क्यूलेटर डाउनलोड करु शकता. डाउनलोड झालेले अॅप ओपन केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. यानंतर तुम्हाला सर्चचा पर्याय दिसेल, तुम्हाला जेथे मोजमाप करायचे असेल तेथे तुम्हाला येथे शोधावे लागेल. त्यानंतर तुम्हाला मोजमाप करण्याचे क्षेत्र निवडून ज्या जागेचे मोजमाप करायचे आहे, त्याची अचूक निवड करुन मोबाईल स्क्रीनवर दिसत असलेल्या बिंदूंना स्पर्श करुन त्याचे क्षेत्र निश्चित करायचे आहे. यानंतर जमिनीचे किंवा शेताचे मोजमाप तुम्हाला वरच्या बाजूला असलेल्या ब्लॅक बॉक्समध्ये सहज दिसेल.
मोबाईलने जमीन किंवा शेत मोजण्याचे फायदे
१) सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्यावर एकही पैसा खर्च होत नाही.
२) पटवारीच्या मदतीशिवाय तुम्ही जमिनीचे किंवा शेताचे मोजमाप करू शकता.
३) टेपशिवाय जमीन किंवा शेताचे मोजमाप करू शकते.