बीड : कृषी क्षेत्रामधील सर्वाधिक अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केलेला आणि कृषी क्षेत्रात प्रगती साधनांचा वापर करणारा देश म्हणजे इस्राईल. कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन हे तंत्र इस्राईलच्या असून या तंत्राने जगभरात नावलौकिक मिळवलेला आहे. अशाच प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान आपल्या महाराष्ट्रातील तरुण शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत त्यांचे कौतुकही विविध माध्यमातून केले जाते. नुकतेच इस्राईलचे राजदूत इयर इशेल त्यांनी थेट एका प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतात येऊन त्यांनी फुलवलेल्या केशर आंब्याची पाहणी केली आणि त्या शेतकऱ्यांनी वापरलेल्या तंत्रज्ञानाचे कौतुक केले आहे.
बीड जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी आणि माजी सभापती यूधाजीत पंडीत यांनी त्यांच्या शेतामध्ये केशर आंब्याची लागवड करून हा आंब्याचा बाग अतिशय चांगल्या पद्धतीने फुलवली आहे. पंडित हे शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती असून त्यांचे शेत गेवराई बीड राष्ट्रीय महामार्ग जवळ गोविंदवाडी लगत आहे. या शेतामध्ये त्यांनी इस्राईल या देशाच्या कृषी विभागाशी संलग्न असलेल्या फळ संशोधन केंद्रामार्फत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केशर आंब्याची लागवड केलेली आहे व उत्तम रित्या बाग फुलवली आहे.
आंब्याचा भाग बघण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी अक्षरशः गर्दी केली आहे व इतकेच नाही तर इतर जिल्ह्यातील शेतकरी देखील पंडित यांच्या बागेला भेट देत आहेत. हा फुलविलेला आंबा बाग पाहण्यासाठी रविवारी इस्राईलचे राजदूत इयर इशेल यांनी पंडित यांच्या शेतात येऊनत्यांनी लावलेल्या केशर आंब्याच्या बागेची पाहणी केली.तसेच पाहणी दरम्यान त्यांनी बारकाईने निरीक्षण करून पंडित यांना काही सूचना देखील केल्या. इस्राईल तंत्रज्ञानाचा वापर करून यूधाजीत पंडीत यांनी फुलवलेल्या आंब्याच्या बाग पाहून त्यांचे कौतुक देखील केले.
या केशर आंब्याची लागवड करून अडीच वर्षाचा कालावधी लोटला असून यामध्ये त्यांनी योग्य पद्धतीने केशर आंबा बाग फुलवली आहे. या बागेतील प्रत्येक झाडाची योग्य वाढ झालेली असून अपेक्षेपेक्षा जास्त फळे झाडाला लागलेली आहेत. यावेळी इयर इशेल यांनी म्हटले की जर असेच तंत्रज्ञान वापरून शेती केली तर आर्थिक प्रगती निश्चित होईल. पंडीत यांचे उदाहरण घेऊन इतरही शेतकऱयांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि आपल्याकडील ज्ञानाचा वापर करून, शेती क्षेत्रात भारताचे नाव मोठे करावे असे त्यांनी सांगीतले.