लिली फुलांच्या लागवडीकडून करा लाखों रुपयांची कमाई; जाणून घ्या कशी?

पुणे : अलीकडच्या काही वर्षांमध्ये फुलशेतीकडे वळणार्‍यांची संख्या वाढली आहे. सध्या लिली फुलशेतीला शेतकर्‍यांकडून सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. लिली हे खासकरुन सजावटीसाठी वापरले जाणारे फूल आहे. यामध्ये अनेक वेगवेगळ्या रंगाच्या फुलांचे प्रकार आहेत. पॉली हाऊसमध्ये तर वर्षभर त्याचे उत्पादन शक्य आहे. या फुलांना मोठी मागणी असल्याने यामाध्यमातून शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदाही होतो.

अशी करा लिलीची फुलांची लागवड

लिलीची लागवड तीन टप्प्यांत केली जाते. पहिल्या टप्प्यात टिश्यू प्रक्रियेतून नर्सरी तयार करतात. हे काम मोठ्या प्रयोगशाळा किंवा कंपन्यांमध्ये केले जाते. दुसर्‍या टप्प्यात नर्सरीत लागवड केली जाते. या वनस्पतीला फुले मिळत नाहीत तर कंद मिळतात. तिसर्‍या टप्प्यात ते कंद भांड्यांमध्ये लावले जातात यातूनच फुले मिळतात. डोंगराळ राज्यांमधील वातावरण लिली फुलासाठी अनुकूल आहे. अशा भागातील शेतकरी पॉलिहाऊस शिवाय उघड्यावरही लिलीची लागवडही करू शकतात. तर मैदानी भागात लिली लागवडीसाठी पॉलि हाऊसची आवश्यकता असते.

तीन महिन्यानंतर तयार होते कंद

पॉली हाऊसमध्ये लागवडीसाठी २.५ किलो कोकोपेट, २.५ किलो गांडूळ खत, २.५ किलो स्ट्रॉ आणि ५ किलो कोळशाची राख आवश्यक आहे. या सर्वाचे मिश्रण लागवड करणार असलेल्या क्षेत्रावर टाकणे आवश्यक आहे. त्यानंतर कंदची लागवड करावी लागते. कंद वाढायला तीन महिने लागतात पण याच काळात चांगली काळजी घेणे आवश्यक आहे. लागवडीनंतर तीन महिन्यांनंतर कंद तयार होते आणि त्यानंतर त्याची मुळासकट काढणी केली जाते.

कंद लागवडीनंतर ३० दिवसानंतर फुले

लिली फुलाचे कंद विकून पैसे कमवता येतात. जर कंद विकायचे नसतील तर ते भांड्यात ठेवा आणि फुले वाढवून थेट विकता येतात. कंद लागवडीनंतर ३० दिवसांनी हिरवी कळी दिसते आणि त्यानंतर लगेचच फुले फुलतात. या फुलांना मोठी मागणी असल्याने यातून लाखों रुपयांची कमाई करता येते.

Exit mobile version