शेतीच्या बांधावर बांबू शेती करुन कमवता येतात लाखों रुपये; जाणून घ्या कसे?

bamboo

पुणे : ग्रामीण भागात बांबूची लागवड अजूनही मोठ्या प्रमाणावर केली जाते. ही अशी शेती आहे, जी एकदा लावली तर ३० ते ४० वर्षे नफा मिळवता येतो. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे म्हणून सरकारही बांबू लागवडीला राष्ट्रीय बांबू मिशनच्या माध्यमातून आर्थिक प्रोत्साहन देते. अनेक शेतकरी बांबूची शेती करतात तर काही प्रगतीशिल शेतकरी त्यांच्या मुख्य पिकांसोबत शेतीच्या बांधावर बांबूची शेती करुन लाखों रुपये कमवतात.

बांबूची कलमांपासून लागवड करता येते. बांबूचे पीक तीन ते चार वर्षांत पूर्णपणे तयार होते. यानंतर, त्याची काढणी करून आणि बाजारात विकून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. बांबूची शेती करतांना त्याच्या सोबत जोड पिकांचे उत्पादन घेणे शक्य आहे. प्रत्येक बांबू रोपाच्या मध्यभागी एक योग्य जागा आढळते. या झाडांमध्ये आले, हळद, जवस आणि लसूण यासारखी फायदेशीर पिके घेऊन तुम्ही चांगला नफा मिळवू शकता.

बांबूपासून शिडी, टोपल्या, मॅट, फर्निचर, खेळणी, टूथब्रश आणि सजावटीच्या वस्तू तयार केल्या जातात. याशिवाय कागद बनवण्यासाठीही बांबूचा वापर केला जातो. बांबूच्या काड्यांपासून उत्पादने बनवणार्‍या कंपन्याही शेतकर्‍याकडून बांबू घेण्यासाठी चांगली रक्कम देतात. यामुळे बांबूच्या लागवडीकडे अनेक शेतकर्‍यांचा कल वाढतांना दिसत आहे.

एक शेतकरी एका एकरात १५० ते २५० बांबूची रोपे लावू शकतो. तीन ते चार वर्षांनी, जेव्हा तुम्ही त्याची कापणी कराल तेव्हा तुम्हाला ४० लाखांपर्यंतचा नफा आरामात मिळू शकेल. बांबूच्या झाडामध्ये सुमारे ४० वर्षे जगण्याची क्षमता असते. जर तुमच्याकडे बांबू लागवडीसाठी जागा कमी असेल तर तुम्ही मुख्य पिकाच्या बांधावर देखील लागवड करू शकता. यासोबतच नफाही अनेक पटींनी वाढेल.

Exit mobile version