पुणे : देशात मान्सून वेळेआधी दाखल झाला असला तरी त्याचा पुढील वाटचाल खोळंबली आहे.त्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनची शेतकरीसह सर्वसामान्य आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान, अशात राज्यात पुढील पाच दिवस पूर्व मोसमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यताय. दक्षिण मध्य महाराष्ट्रासह कोकण पट्ट्यात आणि घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
नाशिक, पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात पूर्वमोसवी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी आणि जालना जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. तसंच विदर्भातही हलका पाऊश होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
कोकणात लवकरच आगमन…
मान्सूनच्या प्रवाहात बदल होतोय. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी परिसरात मान्सूनपूर्व सरींना गेल्या दोन दिवसांपासून सातत्यानं हजेरी लावली आहे. कोकणात आता लवकरच मान्सूनचं आगमन होण्याची शक्यताय. दरम्यान, उर्वरीत महाराष्ट्रात पुढीत पाच ते सात दिवस पूर्व मोसमी पाऊस बरसेल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिलीय.