नंदूरबार : मिरची हे हमखास नफा देणारे पिक मानले जाते. मिरचीची मागणी वर्षभर असते. मिरचीमध्ये नवनवीन सुधारित वाण आणि लागवडीचे तंत्रज्ञान यामुळे उत्पादकता वाढत आहे. मिरचीचा तिखटपणा, आकार आणि उपयोग यावरुन मिरचीच्या जातीचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे तिखट व मसाल्यासाठी वापरण्यात येणार्या जाती. या लांब, तिखट, हिरबी किंबा वाळलेली मिरची म्हणून उपयोगात आणतात. या प्रकारामध्ये संकेश्बरी, पुसा ज्वाला, एन.पी. ४६,पंत सी – १, फुले ज्योती जी-४ यांचा समावेश होतो. दुसरा प्रकार म्हणजे भाजीसाठी वापरण्यात येणारी ढोबळी मिरची.
मिरची पिकाची लागवड पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या तिनही हंगामात करता येते. परंतू हिवाळी हंगामात २० ते २५ अंश सें.ग्रे. पेक्षा कमी तापमान असल्यामुळे मिरची पिकाची वाढ चांगली होत नाही आणि त्यामुळे फुलधरणा व फळधारणा कमी प्रमाणात होते. त्यासाठी ४० इंचापेक्षा कमी पाऊस असणे चांगले असते. हंगामात तापमान ३५ अंश सें.ग्रे. पेक्षा अधिक गेल्यास फुलांची गळ होऊन उत्पादनात घट येते. मध्यम ते काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन मिरची पिकास योग्य असते. हलक्या जमीनीत योग्य प्रमाणात खत घातल्यास चांगले पीक येऊ शकते.
मिरची हे पीक खरीप आणि उन्हाळी हंगामात घेतात. खरीप हंगामामध्ये बियांची पेरणी मे महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यापासून जूनअखेरपर्यंत करतात. तर उन्हाळी हंगामासाठी जानेवारी – फेब्रुवारीमध्ये बियाणांची पेरणी करतात. बियाणाचे प्रमाण : मिरचीच्या योग्य जातीची निवड केल्यानंतर रोपे तयार करण्यासाठी चांगळी उगवणक्षमता असलेले, उत्कृष्ठ दर्जाचे, अत्यंत खात्रीशीर बियाणे खरेदी करावे. साधारणपणे हेक्टरी १.० ते १.२५ किलो बी पुरेसे होते. बियाणांची पेरणी करण्यापूर्वी प्रती किलो बियाणास २ ते ३ ग्रॅम थायरम चोळावे. रोपवाटिका तयार करण्यासाठी गादी वाफे तयार करावेत. बियाणांची पेरणी केल्यापासून ४ ते ६ आठवड्यानी आणि १५ ते २० सें.मी. वाढली की रोपांची लागवड करावी.
मिरचीच्या लागवडीचे यश चांगल्या जोमदार रोपावर अबलंबून असते. रोपे तयार करण्यासाठी ३ ते २ मी. लांबी – रुंदीचे आणि २० सें.मी. उंचीचे गादी वाफे तयार करावेत. प्रत्येक गादी वाफ्याबर चांगळे कुजलेले २ धमेले शेणखत, ३० ते ४० ग्रॅम डायथेन एम -४५ बुरशीनाशक तसेच फोरेट १० टक्के दाणेदार कीटकनाशक १५ ग्रॅम प्रत्येक वाफूयात टाकावे आणि मिसळून घ्यावे. वाफ्याच्या रुंदीला समांतर दर १० सें.मी. अंतरावर खुरप्याने २ ते ३ सें.मी. खोल ओळी कराव्यात. या ओळीत बियाणांची पातळ पेरणी कराबी व बी मातीने झाकाबे आणि हलके पाणी द्यावे. उगबण झाल्यावर ५ ते ६ दिवसांनी रोपवाटिकेस पाणी द्यावे. बी पेरल्यानंतर २० ते २५ दिवसांनी रोपांच्या बाढीसाठी प्रत्येक बाफ्यात ५० ग्रॅम युरिया द्यावा. परंतु जास्त प्रमाणात युरिया खताचा वापर टाळावा. त्यामुळे रोपे उंच वाढतात आणि लुसलुसीत राहतात. पर्यायाने रोपांची लागवड केल्यानंतर रोपे मरण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे योग्य प्रमाणात यूरियाचा वापर फायद्याचे ठरतो. सर्वसाधारणपणे बियाणांची पेरणी केल्यापासून ४० ते ५० दिवसांनी रोपे लागवडीस तयार होतात.
मिरची पिकाची लागवड सरी – वरंब्यावर करतात. उंच आणि पसरट वाढणार्या जातींची / वाणांची लागवड ७५ बाय ६० किंवा ६० ६० सें.मी. अंतरावर तर बुटक्या जातीची लागवड ६० बााय ४५ सें.मी. अंतरावर करावी. काळ्या कसदार भारी जमिनीमध्ये लागवडीचे अंतर जास्त ठेवाबे. उन्हाळी हंगामातील मिरची पिकाची लागवड फेब्रुवारी – मार्च महिन्यात कराबी तर खरीप हंगामातील मिरचीची लागवड जून – जुलैमध्ये करावी. लागवडीपूर्वी एक दिवस अगोदर रोपवाटिकेस हलके पाणी द्यावे. त्यामुळे रोपांची काढणी सुलभ होते आणि रोपांची मुळे तुटत नाहीत. तसेच रोपांची लागवड करताना जास्त लांब असलेली मुळे खुरप्याने तोडावीत किंबा जास्त उंचीची रोपे असल्यास रोपाचा शेंडा कट करुन लागवडीसाठी वापरावीत. त्याचप्रमाणे लागवडीपूर्वी रोपे विशेषत: पानाचा भाग पाच मिनिटे १० ग्रॅम कुरॉक्रॉन २५ ग्रॅम, डायथेन एम ४५ ३० ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक १० लीटर पाण्यात मिसळावे आणि या मिश्रणात रोपे बुडवून काढावीत आणि लागवड करावी.
लागवडीसाठी वाफे तयार करण्यापूर्वी २० ते २५ टन चांगळे कुजलेले शेणखत प्रती हेक्टरी जमिनीत मिसळावे. मिरची पिकासाठी १००:५०:५० किलो ननत्र:स्फुरदःपालाश प्रती हेक्टरी द्यावे आणि नत्राचा अर्धा हप्ता लागवडीनंतर ४ ते ६ आठवड्यांनी म्हणजे फुल आणि फळधारणेच्या वेळी द्यावा. खतांची मात्रा दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे. पूर्ण वाढलेल्या हिरव्या फळांची तोडणी देठासह दर १० ते १५ दिवसांच्या अंतराने करावी. हिरव्या मिरचीची तोडणी लागवडीपासून ६० ते ७० दिवसांनी सुरु होते आणि पुढे ३ ते ४ महिने तोडे सुरु राहतात. सर्वसाधारणपणे ८ ते १० तोडे मिळतात.