जळगाव लाईव्ह न्यूज । मधमाशांबद्दल सर्वांना माहित आहेच. मधमाशींचे पोळेही अनेकांनी पाहिलेले आहेत. तर काहींनी मधमाशी चावण्याचा त्रासदायक अनुभव देखील घेतला असेल. मात्र तुमच्या पैकी किती लोकांना मधमाशींच्या कामाबद्दल आणि वयाबद्दल माहित आहे. सर्व मधमाशा मध गोळा करण्याचे काम करतात, असा अनेकांचा समज आहे. मात्र राणीमाशी, नरमाशी आणि कामकरी माशी अशा तिन प्रकारच्या मधमाशा असतात. आणि त्यांचे कार्य व वयोमान देखील वेगवेगळे असते.
मधमाशींच्या पोळ्यामध्ये केवळ एक मधमाशी असते ती साधारणत: २ ते ३ वर्षे जगते. त्या पोळ्यात गरजेनुसार १०० ते २०० नर माशी असतात त्यांचे वय साधारणत: २४ दिवस असते. या शिवाय ५० ते ६० हजार कामकरी मधमाश्या असतात. त्यांचे वय साधारणत: २१ दिवस असते. तिन्ही प्रकारच्या माशींचे कार्य वेगवेगळे असते. राणीमाशी केवळ नरमाशांशी संबंध ठेवून अंडी घालण्याचे काम करते. नर माशींचे वय संपले की त्या मरतात. मेलेल्या माशा पोळ्यातून बाहेर टाकण्याचे तसेच मध गोळा करण्याचे काम कामकरी माशा करतात. नवीन पोळे बांधण्याचे कामे कामकरी माश्या बजावतात. त्याचबरोबर वसाहतीत विशिष्ट ठिकाणी पराग संचयन करणे, मकरंदापासून मधाची निर्मिती करणे व वसाहतीचे तापमान नियंत्रित ठेवण्यासह पोळ्याची सुरक्षा करण्याचे काम देखील त्या करतात.
राणी माशी कडे फक्त प्रजननाचे कार्य असते. राणी माशी व कामकरी माशी या दोन्ही मादी असल्या तरी राणी माशी ही वसाहतीतील एकमेव फलित मादी असते. कामकरी माश्यांमध्ये निसर्गत: अंडकोशाची वाढ झालेली नसते. त्यांना अंडी घालता येत नाहीत.
मधमाशींबद्दलची १५ तथ्ये तुम्हाला माहित आहेत का?
१) मधमाशी वसाहतीत किंवा पोळ्यामध्ये ५०००० ते ६०००० मधमाशा असतात त्यापैकी एक राणी मधमाशी असते व १०० ते २०० नर माशी असतात.
२) नर मधमाशीचे काम फक्त राणी मधमाशी गर्भ धारण करणे आहे जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा नर मधमाशा कामकरी माशा द्वारे मारल्या जातात.
३) मध गोळा करण्याचे काम केवळ कामकरी माशाच करतात.
४) मधमाशी त्याच्या संपूर्ण आयुष्यात फक्त १/१२ चमचे मध तयार करते.
५) मधमाशीला मध जमा करण्यासाठी ५० ते १०० फुलांवर फिरावे लागते.
६) सुमारे ५०० ग्रॅम मध बनवण्यासाठी मधमाशीला ९०००० मैल उड्डाण करावे लागते म्हणजे पृथ्वीच्या तीन पट.
७) मधमाशा ताशी २० ते ३० किलोमीटर वेगाने उडू शकतात.
८) मधमाशा प्रति सेकंदात २०० वेळा पंख फडकवतात.
९) मधमाशीच्या शरीरात दोन पोट असतात एक खाण्यासाठी आणि एक फुलांचे रस गोळा करण्यासाठी.
१०) मधमाशांना जन्मापासूनच मध बनवण्याची कला माहीत नाही नसते हे काम त्यांना पोळ्यातील जुन्या मधमाशी शिकवतात.
११) मधमाशी नृत्य करून एकमेकांशी संवाद साधतात.
१२) उन्हाळ्यात एक राणी मधमाशी दररोज २५०० अंडी घालते.
१३) हिवाळ्यात काही कामगार मधमाश्या पोळ्याला उबदार ठेवण्याचे काम करतात जिथे ते ३५ अंश अनुकूल तापमान राखण्यासाठी त्यांचे शरीर कंपित करत असतात.
१४) काम करणार्या भाषांपेक्षा नर माशा आकाराने मोठ्या असतात परंतु त्यांना डंक नसतात आणि तेही काम करत नाही.
१५) मधमाशांच्या डंकमध्ये विष असते जे उच्च रक्तदाब आणि अनेक आजारांवर उपचार म्हणून वापरले जाते.