रत्नागिरी : हापूस आंब्याच्या ऑनलाईन (Online) खरेदी-विक्रीसाठी अॅमेझॉन कंपनीनं पुढाकार घेतला आहे. कंपनीनं मिरजोळे एमआयडीसीमध्ये आंबा संकलन केंद्र सुरू केले आहे. ही कंपनी रत्नागिरी हापूस आंबा (Ratnagiri Hapus Mango) विकणार असून थेट बागायतदारांकडून आंबा खरेदीला अॅमेझॉनने सुरुवातही केली आहे.
उन्हाळा सुरू झाला की, सर्वांना कोकणातल्या हापूस आंब्याची चाहूल लागते. हापूस आंबा म्हणजे सर्वांच्या आवडीचा विषय.. खवय्यांना त्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागते. ग्राहकांना उत्तम हापूस आंब्यांचा शोध घेण्यासाठी अनेक बाजारपेठांच्या चकरा माराव्या लागतात. शोध घेतल्यानंतरही चांगल्या प्रतिचा हापूस मिळेल की नाही याबाबत श्वास्वती नसते. परंतु, आता या आंब्याची ऑनलाईन खरेदी करता येणार आहे.
‘होय खरंच सांगतलंय… हापूस आंबा आता ऑनलाईन पण उपलब्ध आहे. अॅमेझॉन (Amazon) या ऑनलाईन साईटवर हापूस आंबा आता विकत घेता येणार आहे. हापूस आंब्याच्या ऑनलाईन खरेदी-विक्रीसाठी अॅमेझॉन कंपनीनं पुढाकार आहे. कंपनीनं मिरजोळे एमआयडीसीमध्ये आंबा संकलन केंद्र सुरू केले आहे. ही कंपनी रत्नागिरी हापूस आंबा विकणार असून थेट बागायतदारांकडून आंबा खरेदीला अॅमेझॉनने सुरुवातही केली आहे.
यंदा उत्पादनात घट झाल्यानं हापूस आंबा मिळणं दुरापस्त झालं होतं. पण आता अॅमेझॉन यामध्ये उतरले असल्याने मुख्य शहरांमध्ये ग्राहकांपर्यंत हापूस आंबा पोहचवला जाणार आहे. यामुळं उत्पादकांना योग्य दर आणि ग्राहकांना खात्रीशीर भौगेलिक मानांकन मिळालेलाच आंबा मिळणार आहे. विविध वस्तूंबरोबरच रत्नागिरी हापूसही ऑनलाइन मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांकडून विक्री केला जात आहे. त्यात अॅमेझॉन कंपनीकडून सुरूवातीलाच १२ शेतकऱ्यांकडून ६०० डझन आंब्याची खरेदी केली आहे. १८५ ते २२० ग्रॅमपर्यंतचे पिकलेले फळ प्रतिडझन ९०० रुपयांनी खरेदी करण्यात आले.
रत्नागिरीतील आंबा संकलन केंद्राचे उद्घाटन पणन मंडळाचे सरव्यवस्थापक मिलिंद जोशी, आंबा बागायतदार समीर दामले, प्रमुख व्यवस्थापक राजेश प्रसाद, विवेक धवन, सुजय हेगडे, नरेंद्र जवळे, श्री. कल्पेश यांच्यासह बागायतदार उपस्थित होते. हे ॲमेझॉनचे महाराष्ट्रातील चौथे, तर भारतातील सातवे संकलन केंद्र आहे. येथे आंबा बागायतदारांकडून आंबा विकत घेऊन मुंबई, तसेच पुणे येथील ॲमेझॉनच्या ग्राहकांना पोहोचवला जाणार आहे. भविष्यात देशाच्या कानाकोपऱ्यात निर्यातही केला जाणार आहे. आंबा खरेदी केल्यानंतर बागायतदाराला त्वरित पैसे दिले जाणार आहेत. तसेच आंबा बागायतदार राजेश पालेकर यांच्या सूचनेनुसार पुढील आठवड्यापासून बिटकी आंबाही खरेदी केला जाईल.