• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

सेंद्रिय शेतीला गती देणार : शरद पवारांचे आश्वासन

मनीषा येरखेडेbyमनीषा येरखेडे
in सेंद्रिय शेती
March 28, 2022 | 12:44 pm
organic farming

बारामती : सेंद्रिय शेती उत्पादनांचे महत्त्व जगभर वाढत आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे त्यांच्या उत्पादन व मार्केटिंग बाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरच राज्य सरकार व केंद्र सरकार बरोबर बैठक घेऊन सेंद्रिय शेतीला गती देणार आसल्याचे मत माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार यांनी व्यक्त केले.

कन्हेरी (बारामती) येथे महा अॉरनिक ॲन्ड रेश्युड्युफ्री फार्मर्स असोशिएशन अर्थात मोर्फाच्या राज्यस्तरीय संचालक व जिल्हा अध्यक्षांच्या बैठकीत बोलताना वरील विचार खा. पवार यांनी मांडले. यावेळी व्यासपीठावर मोर्फाचे तज्ञ संचालक युगेंद्रदादा पवार, अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे, उपाध्यक्ष स्वाती शिंगाडे, सचिव प्रल्हादकाका वरे, माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, अतुल शहा, सुदामाआप्पा इंगळे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोर्फाचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी केले. त्यावेळी त्यांनी राज्यभरातील सेंद्रिय शेतीच्या अडचणी व मार्केटिंग साठी शासनाची मदत कशी आवश्यक आहे ते सांगितले.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यात काही तरी वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने येतात. तसेच ज्या फळपिकांना राज्यात जीआय मानांकन मिळाले आहे अशा पिकांवर लक्ष देउन त्या फळपिकांतील सेंद्रिय उत्पादनाबाबत आपण मोर्फाच्या माध्यमातून पुढाकार घेऊन प्रयत्न करावा. सेंद्रिय शेतीमध्ये मातीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

त्यामुळे सर्वांनी जमिनीचे आरोग्य व जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला तरच सेंद्रिय शेती सोपी होऊ शकते. त्यामुळे यापुढे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोर्फाने सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शकाची भूमिका वठवावी, असा सल्लाही खा  पवार यांनी दिला.

जगभरात आरोग्यच्या दृष्टीने कमालीची जागृकता आली आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती उत्पादनांना भविष्यात मोठी मागणी वाढणार आहे त्या दृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांनी सावध पावले उचलून सेंद्रिय शेती वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. सेंद्रिय शेतीच्या असलेल्या आपल्या अडचणीबाबत मी स्वतः मोर्फा पदाधिकाऱ्यासमवेत राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही खा.पवार यांनी बैठकीत सांगितले.

बैठकीत राज्यभरातून आलेल्या संचालकांना तज्ञ संचालक युगेंद्रदादा पवार यांनी मार्गदर्शन केले व मार्केटिंग बाबत आपण एकत्रित महाराष्ट्राचा ब्रँड करु असे सांगितले. यावेळी राज्यभरातील संचालक व जिल्हा अध्यक्षांनी आपापल्या भागातील सेंद्रिय उत्पादनाबाबतच्या अडचणी सांगितल्या.

यावेळी अमरजित जगताप, बाळासाहेब घोरपडे, डॉ, प्रशांत नायकवडी, कृषिभूषण वसुदा सरदार, ॲड प्रकाश पाटिल, कल्याण काटे, सागर पाटिल, क्सुनिल ढवळे, हरिभाऊ यादव, योगेश रायते, संजय दिघे सह राज्यभरातील मोर्फा चे प्रतिनिधी संचालाक व जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते.

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

money farmer

मल्टी लेयर फार्मिंग तंत्रातून शेतकरी कमवू शकतात ३ ते ४ पट नफा; जाणून घ्या सविस्तर

August 9, 2022 | 5:00 pm
farmer 1 1

शेतातील मातीची सुपिकता वाढविण्यासाठी हा आहे तज्ञांचा सल्ला; तुम्हीही अवलंब करा होईल मोठा फायदा

August 9, 2022 | 4:25 pm
pik vima

पीकविमा योजनेत सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांची संख्या तब्बल ८ लाखांनी वाढली, हे आहे कारण

August 9, 2022 | 2:29 pm
shinde farmer

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मुख्यमंत्री शिंदेनी दिले असे आश्‍वासन की सगळेच झाले खुश

August 9, 2022 | 2:10 pm
gomutra

गोमूत्राचा बीजप्रक्रियेसह कीटकनाशके म्हणून असा करा वापर; होतील मोठे फायदे

August 8, 2022 | 6:07 pm
favarani Pesticides

मजूर टंचाईवर शोधला जालीम उपाय; शेतातील तण काढण्यापासून कीटकनाशक फवारणीसाठी अत्याधुनिक मशिन

August 8, 2022 | 3:42 pm
Next Post
orange-business-worth-rs-1500-crore-annually-in-maharashtra-alone

संत्रा बागेच्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी हे करा

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट