शेत मालाच्या योग्य दरासाठी सॅाफ्टवेअर, जाणून घ्या कसा होणार फायदा….

- Advertisement -

सोलापूर : शेतमालाच्या आधारभूत किंमतीचा (एमएसपी) मुद्दा गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. यावर केंद्र सरकारच्या पातळीवरुन अद्यापही ठोस तोडगा निघत नसतांना आता शेतीमालाला किफायतशीर दर मिळावा यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून एक विशेष सॉफ्टवेअर विकसीत करण्यात आले आहे. यासाठी केंद्र सरकारकडून पेटंटही प्राप्त झाले आहे.

सोलापूर विद्यापीठाकडून तयार करण्यात आलेल्या या सॉफ्टवेअरचे नाव ‘अ‍ॅन इंटिलिजेंट सिस्टिम अ‍ॅण्ड ए मेथड फॅार सिस्टिमॅटिक डिस्ट्रिब्युशन ऑफ अग्रीकल्चर गूडस्’ असे आहे. केंद्र सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून याला पेटंटही जाहीर करण्यात आले आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने शेतीमालाला योग्य दर मिळावा म्हणून कोणत्या वेळी कोणते पीक घ्यावे, शिवाय कोणत्या शेतीमालाला कोणत्या कालावधीमध्ये अधिकचा भाव मिळणार आहे याची माहिती मिळणार आहे.

तर हवामानानुसार कोणत्या विभागामध्ये कोणते पीक घ्यावे याची अचूक माहिती शेतकर्‍यांना होणार आहे. अद्याप या सॉफ्टवेअरचा वापर सुरु झालेला नाही पण विद्यापीठाकडून तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरचा उपयोग हा शेतीमालाच्या दरासाठी शेतकर्‍यांना आणि शासनालाही याचा फायदा होणार आहे.

हे देखील वाचा