• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

मूग, उडीदचे उत्पादन वाढविण्यासाठी असे हवे नियोजन

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in पीक लागवड
January 13, 2022 | 12:59 pm
Moog-udid

खरीप हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल मूग आणि उडीद ही महत्वाची पिके गणली जातात. या दोन्ही पिकांची मिळुन महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे ७ ते ८ लाख हेक्टर क्षेत्रावर शेती होते. मूग आणि उडीद ही ७० ते ८० दिवसांत येणारी पिके असल्यामुळे थोडयाशा पावसात देखील लाभ उठवू शकतात. दुबार तसेच मिश्र पीक पध्दतीसाठी ही दोन्ही पिके अतिशय महत्तवाची आहेत.

जमिन:

मुग आणि उडीदाला मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमिन आवश्यक असते. पाणी साचुन राहणारी क्षाररपड, चोपण, किंवा हलकी जमीन टाळावी.

पूर्वमशागत :

चांगली पूर्वमशागत ही मुग आणि उडीदाच्या अधिक उत्पादनासाठी आवश्यक बाब आहे. यासाठी उन्हाळ्यापूर्वी जमीन नांगरावी. ती चांगली तापु द्यावी आणि पावसाळा सुरु होताच कुळवाच्या पाळ्या घ्याव्यात. काडी, कचरा, धसकटे वेचुन घ्यावीत. याच वेळी हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत घालावे.

पेरणीची वेळ :

मुग आणि उडीद ही दोन्ही पिके खरीप हंगामातील आहेत. त्यामुळे मान्सुनचा पाहिला पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनित वापसा येताच म्हणजे जुनचा दुसरा पंधरवाडामध्ये पेरणी पूर्ण करावी. पेरणी जसजशी उशिरा होत जाईल त्याप्रमाणे उत्पादनात मोठी घट होते.

सुधारित वाण :

मुगामध्ये अनेक वाण उपलब्ध आहेत यातील वैभव हा वाण खरीप व उन्हाळी या दोन्ही हंगामासाठी उपायुक्त आहे. मुगामध्ये वैभव व बी. पी. एम. आर. १४५ हे दोन वाण रोगप्रतिकारक व अधिक उत्पादन देणारे चांगले वाण आहेत. हे दोन्ही वाण भुरी रोगाला प्रतिकारक आहेत आणि कोपरगांव या पारंपारिक वाणापेक्षा अधिक उत्पादन देणारे आहेत. कोपरगांव- १ हा मुगाचा जुना वाण असुन त्यावर भुरी रोगाचा मोठा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे हा वाण घेण्याचे टाळावे. उडीदामध्ये काही मोजकेच वाण आहेत. त्यापैकी टीपीयु-४, टीएयु १ हे दोन वाण उत्कृष्ट गणले जातात. टीपीयु-४ व टीएयु-१ हे दोन्ही टपोऱ्या काळ्या दाण्यांचे वाण असुन पक्वतेचा कालावधी ७० ते ८५ दिवसांचा आहे.

बीजप्रक्रिया :

पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर लावावी व त्यानंतर २५ ग्रॅम रायझोबियम जिवाणुवाचा पावडर गुळाच्या थंड पाण्यामध्ये मिसळुन लावावी. मूग, उडीद, या पिकांच्या बियाणासाठी चवळी गटाचे रायझोबियम जिवाणु सवंर्धन वापरावे. ट्रायकोडर्मामुळे बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण होते. रायझोबियम मुळे मुळावरील गाठी वाढून नत्राचा उपलब्धता वाढते.

पेरणीचे अंतर :

मुग आणि उडिद ही पिके अतिशय कमी कालावधीची (७० ते ८० दिवस) असल्यामुळे सलग अथवा आतंरपिक म्हणुन घेतले जाते. या दोन्ही पिकांचे पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर ३० सें. मी. व दोन रोपांमधील अंतर १० से.मी. राहील या बेताने पेरणी करावी. पेरणी पाभरीणे करणे चांगले. या पिकांमध्ये तुरीचे आंतरपिक घ्यावयाचे असल्यास मुख्य पिकांच्या दोन चार ओळीनंतर एक तुरीची पेरणी करावी. बियाणे प्रमाण १५-२० किलो/हेक्टर

खतमात्रा :

या दोन्ही पिकांना २० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद म्हणजेच १०० किलो डीएपी प्रति हेक्टरी द्यावे. शक्यतो रासायनिक खते ही चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळुन बियानालगत पेरून द्यावी म्हणजे त्याचा प्रभाव चांगला होतो..

आंतरमशागत :

सुरुवातीपासूनच पिक तणविरहीत ठेवणे ही पिकाच्या जोमदार वाढीसाठी आवश्यक बाब आहे. पीक २० ते २५ दिवसांचे असतांना पाहिली आणि ३०-३५ दिवसांचे असतांना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्यतो वापशावर करावी, कोळपणी नंतर दोन रोपांतील तल काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी. ही पिके ३०-४५ दिवस तण विरहीत ठेवणे हे उत्पादन वाढीच्या दृष्टीने आवश्यक असते.

पाणी व्यावस्थापन :

ही पिकेसर्वस्वी पावसावर येणारी आहेत. या पिकांना फुले येतांना आणि शेंगा भरताना ओल्याव्याची करमतरता भासु लागते. अशा परिस्थितीत पाऊस नसेल आणि जमिनीत ओलावा खुपच कमी झाला असेल तर फुले येण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या काळामध्ये हलके पाणी द्यावे. किंवा २% युरियाची फवारणी करावी.

Groundnut

भुईमूग लागवडीतून कमवा लाखोंचा नफा; जाणून घ्या भुईमूग शेतीचे विशिष्ट तंत्र

cotton tree

कापसाची उगवण शक्ती आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी तज्ञांचा आहे हा सल्ला; वाचा सविस्तर

banana-tree

३० किलो पेक्षा जास्त वजनाचे केळी घडाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी वापरले हे विशिष्ट तंत्र; जाणून घ्या सविस्तर

kalihari

ऑगस्टमध्ये ‘या’ औषधी वनस्पतींची लागवड करून कमवा मोठा नफा

crope

मान्सूनच्या वेगाला ब्रेक, ‘या’ भागात भात आणि इतर पिकांच्या पेरणीला होणारा विलंब

Papaya

पपई लागवडीतून लाखों रुपये कमविण्यासाठी या पध्दतीचा वापर करा

पीक संरक्षण :

मुगावर रस शोषणाच्या किडी आणि उडीदावर केसाळ अळ्या यांचा प्रादुर्भाव होतो. उडीदा वरील केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५% ई.सी. १००० मिली ५०० लिटर पाण्यापासुन फवारावे. एखाद्या झाडावर केसळ अळ्यांच्या प्रार्दुभाव दिसताच ती झाडे उपटावीत व सर्व अळ्या टाकाव्यात. या पिकांवर प्रामुख्याने भुरी आणि पिवळा विषाणु या रोगांचा प्रार्दुभाव आढळुन येतो. भुरी रोगाच्या प्रार्दुभावामुळे पिकाच्या खालील पानांवर पांढरे ठिपके दिसून येतात. तसेच पिक्ळा विषणु या रोगाचा प्रसार पांढरी माशी या किडीमार्फत होतो. या रोगांमुळे कोवळ्या पानावर लहान पिवळे ठिपके दिसतात व थोड्याच दिवसात पानांच्या बऱ्याचश्या भागावर अनियमित अकाराचे चट्टे दिसु लागतात.

यामुळे उत्पादनात घट होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिळसणारे गंधक १२५० ग्रॅम किंवा ५०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम ५०० लिटर पाण्यातुन प्रति हेक्टरी फवारावे. आवश्यकता भासल्यास ८-१० दिवसांनी आणखी एक फवारणी करावी. पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी फोरेट १० टक्के दाणेदार १० किलप प्रति हेक्टर प्रार्दुभाव दिसु लागताच धुरळणी करावी. तसेच शेंगा पोखरणाऱ्या किडींच्या नियांत्रणासाठी क्लोरान्टानीलीप्रोल १८.५ टक्के प्रवाही २ मिली अथवा फ्ल्युबेडमाईड ३९.३५ टक्के प्रवाही २ मिली अथवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही १२.५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन प्रादुर्भाव दिसु लागताच यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी.

काढणी:

मूगाच्या शेंगा ७५ टक्के वाळल्यानंतर पाहिली तोडणी व त्या नंतर ८-१० दिवसांनी राहिलेल्या सर्व शेंगा तोडाव्यात. शेंगा खळ्यावर चांगल्या वाळवल्यावर मळणी करावी. उडीदाची कापणी करुन खळ्यावर आणून त्याची मळणी करावी. उडीदाच्या शेंगा तोडण्याची गरज भासत नाही. साठवणीपुर्वा मुग व उडीद धान्य ४-५ दिवस चांगले उन्हात वाळवून पोत्यात किंवा कोठीत साठवावे. साठवण कोंदट व ओलसर जगेत करु नये. साठवताना कडुनिंबाचा पाला (५ज्ञ) धान्यात मिसळावा. त्यामुळे साठवणीत कीड लागत नाही.

उत्पादन :

अशा प्रकारे चांगली काळजी घेऊन वाढविलेल्या पिकापासुन मूगाचे १२ ते १५ क्विंटल तर उडीदाचे १० ते १२ क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते.

(साभार : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2020-21, माहिती पुस्तिका – लागवड व तंत्रज्ञान)

हे देखील वाचा :

  • मल्टी लेयर फार्मिंग तंत्रातून शेतकरी कमवू शकतात ३ ते ४ पट नफा; जाणून घ्या सविस्तर
  • शेतातील मातीची सुपिकता वाढविण्यासाठी हा आहे तज्ञांचा सल्ला; तुम्हीही अवलंब करा होईल मोठा फायदा
  • पीकविमा योजनेत सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांची संख्या तब्बल ८ लाखांनी वाढली, हे आहे कारण
  • नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मुख्यमंत्री शिंदेनी दिले असे आश्‍वासन की सगळेच झाले खुश
  • गोमूत्राचा बीजप्रक्रियेसह कीटकनाशके म्हणून असा करा वापर; होतील मोठे फायदे
Tags: MoogUradउडीदमूग
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

money farmer

मल्टी लेयर फार्मिंग तंत्रातून शेतकरी कमवू शकतात ३ ते ४ पट नफा; जाणून घ्या सविस्तर

August 9, 2022 | 5:00 pm
farmer 1 1

शेतातील मातीची सुपिकता वाढविण्यासाठी हा आहे तज्ञांचा सल्ला; तुम्हीही अवलंब करा होईल मोठा फायदा

August 9, 2022 | 4:25 pm
pik vima

पीकविमा योजनेत सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांची संख्या तब्बल ८ लाखांनी वाढली, हे आहे कारण

August 9, 2022 | 2:29 pm
shinde farmer

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मुख्यमंत्री शिंदेनी दिले असे आश्‍वासन की सगळेच झाले खुश

August 9, 2022 | 2:10 pm
gomutra

गोमूत्राचा बीजप्रक्रियेसह कीटकनाशके म्हणून असा करा वापर; होतील मोठे फायदे

August 8, 2022 | 6:07 pm
favarani Pesticides

मजूर टंचाईवर शोधला जालीम उपाय; शेतातील तण काढण्यापासून कीटकनाशक फवारणीसाठी अत्याधुनिक मशिन

August 8, 2022 | 3:42 pm
Next Post
how-to-increase-the-yield-of-soybean

सोयाबीनच्या भरघोस उत्पादनासाठी अशा पद्धतीने करा नियोजन

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट