• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

कीटकनाशके खरेदी करतांना व वापरतांना अशी घ्या काळजी, अन्यथा होईल मोठे नुकसान

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in बातम्या
November 2, 2022 | 2:23 pm
favarani Pesticides

औरंगाबाद : शेती करतांना कीटकनाशकांची फवारणी हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. मात्र कीटकनाशकांची खरेदी किंवा फवारणी करतांना शेतकर्‍यांकडून काही चुका होतात. यामुळे अनेकवेळा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. यामुळे कीटकनाशकांची खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी? तसेच त्याचा वापर करतांना कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे, याची तंत्रशुध्द माहिती असणे आवश्यक आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

सर्वप्रथम कीटकनाशके खरेदी करतांना कोणत्या बाबी महत्त्वाच्या असतात. हे जाणून घ्या. बाजारामध्ये दोन प्रकारची किटकनाशके उपलब्ध असतात एक म्हणजे पाण्यामध्ये मिसळणारी (ईसी,एससी, डब्ल्युपी, डब्ल्यु एससी इ.) तर दुसरी म्हणजे पाण्यात विरघळणारी (एसपी, डब्ल्युएसएल, एसएल, एसजी इ.) पहिल्या प्रकारची किटकनाशके पाण्यात मिसळतात परंतु विरघळत नाहीत त्यामुळे द्रावण करताना सतत ढवळावे. दुसर्‍या प्रकारची किटकनाशके पाण्यात पूर्णपणे विरघळत असल्यामुळे ते किडीसाठी प्रभावी ठरतात व झाडांमध्ये त्वरित शोषली जातात.

कीटकनाशके फवारताना सगळ्यात आधी त्यावर लिहीलेल्या किटकनाशकाच्या डब्यावर पतंगीच्या आकाराचे काही चिन्हं दिलेली असतात, ज्यावरुन त्याच्या जहालपणाचं प्रमाण मिळतं यामध्ये लाल रंग अति विषारी, पिवळा रंग तीव्र विषारी, निळा रंग मध्यम विषारी व हिरवा रंग कमी विषारी असा क्रम लागतो. किटकनाशकाचा उत्पादन दिनांक आणि वापरण्याचा कालावधी पाहून घ्यावा. कालावधी संपलेले किटकनाशके वापरु नये. फवारणीपूर्वी किटकनाशकांची निवड करताना पिकावर कोणती कीड आहे किंवा रोग आहे याची खातरजमा करावी. पिकावर कीड किंवा रोगाचे निदान झाल्यास तज्ञांकडून याची पडताळणी करून घ्यावी व त्या किडी किंवा रोगासाठी शिफारसीत केलेल्या किटकनाशकाचा/ बुरशीनाशकाचा वापर करावा.

प्रथमतः किटकनाशकाचे द्रावण तयार करून घ्यावे. प्लॅस्टिक बकेट मध्ये पाणी घेऊन त्यात किटकनाशक मोजून टाकावे व काठीने ढवळून एकजीव द्रावण तयार करावे. हे द्रावण १०० लिटर पाण्यासाठी तयार केले असल्यास ड्रममध्ये द्रावण टाकून पाण्याची पातळी १०० लिटर करावी व काठीने ढवळून एकजीव द्रावण तयार करावे. त्यानंतरच फवारणी करावी. मात्र हे करत असतांना कीटकनाशकांच्या वापराआधी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा. विविध सापळे जसे की, कामगंध सापळे, चिकट सापळे, प्रकाश सापळे यांचा वापर करावा. पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये जैविक किडनाशकांचा वापरा करावा. त्यानंतरही किडीने आर्थिक नुकसानीची संकेत पातळी गाठल्याचे आढळल्यास रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.

Tags: Pesticidesकीटकनाशक
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
fish

शेततळ्यातील मत्स्यपालनातून लाखों रुपये कमवायचेय? मग हे वाचाच

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट