शेतशिवार । पुणे : हवामान खात्याने आजपासून पुढील ४ दिवस राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये तीव्र हवामानाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने यापूर्वीच राज्यासह येलो अलर्ट जरी केले होते. राज्यातील काही भागात मेघ गर्जनेसह जोरदार पावून होणार असल्याने प्रशासनातर्फे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या २ दिवसांपासून राज्यात थंडी बऱ्यापैकी कमी झाली आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात बऱ्याच तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भातील बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यातील काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी आजपासून ४ दिवस विजांच्या गर्जनेसह पावसाची शक्यता आहे.