शेतशिवार । पुणे : राज्यातील काही भागात गेली काही दिवस पावसानं उघडीप घेतल्यानंतर आता पुन्हा ११ जिल्ह्यांमध्ये ‘येलो अलर्ट’ जरी करण्यात आले आहे. (Today Weather Update) अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे हवेच क्षेत्र तयार झाले होते. आता अंदमानच्या समुद्रात देखील हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तयार होतांना दिसून येत होतं आहे. यामुळे पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची (Today Rain in maharashtra) शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्यातर्फे आज येलो अलर्ट जरी करण्यात आलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर आणि नांदेड यांचा समावेश आहे. पुढील २४ तासांत या जिल्ह्यामंध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाची दाट शक्यता आहे. गेल्या २४ तासांमध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, घाट परिसर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाची नोंद करण्यात आली आहे. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यात अजून भर पडणार असल्याचे दिसून येत आहे.
पुण्यासह ११ जिल्ह्यांमध्ये पुढील ४ ते ५ दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनातर्फे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.