• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

७ लाख रुपयांपेक्षा कमी किमतींत मिळणारे टॉप १० ट्रॅक्टर्स

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in बातम्या
July 7, 2022 | 8:37 am
top 10 tractor

पुणे : कमी कालावधीत जास्तीत जास्त शेती कामे करण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टर्सला पहिली पसंती देतात. ट्रॅक्टर्सच्या मदतीने मोठीत मोठी शेती कामे कमी वेळेत पूर्ण करणे सहज शक्य असते. जर तुम्ही देखील शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल. ता मग हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. यात आम्ही तुम्हाला देशात ७ लाख रुपयांपेक्षा कमी किमतींत मिळणार्‍या टॉप १० ट्रॅक्टर्सची माहिती देणार आहोत. ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल.

१) मैसी फग्यूर्सन २४५ डीआय (Massey Ferguson 245 DI)
मैसी फग्यूर्सन २४५ डीआय या ट्रॅक्टरचे डिझाईन अत्यंत आकर्षक आहे. शिवाय हा दणकट श्रेणीमध्ये मोडतो. या मध्ये चांगले २७०० सीसी इंजिन आणि १७९० इंजिन रेट केलेले आरपीएम जनरेट केलेले आहे. याशिवाय त्यात ४२.५ पीटीओ एचपी वीज निर्मितीसाठी आहे. तसेच या ट्रॅक्टर मध्ये ८ फॉरवर्ड + २ रिव्हर्स गियर बॉक्स देण्यात आले आहेत. मैसी फग्यूर्सन २४५ डीआय या ट्रॅक्टरची किंमत अंदाजे ६.७० ते ७.३० लाख रुपये आहे.

२) स्वराज ७४४ एफई (Swarah 744 FE)
भारतीय शेतकर्‍यांच्या सर्वात आवडत्या ट्रॅक्टरच्या ब्रॅडंपैकी अग्रगण्य नाव म्हणजे स्वराज ट्रॅक्टर्स. शेतकर्‍यांच्या गरजा लक्षात घेऊन ही कंपनी आपले सर्व ट्रॅक्टर्स अत्याधुनिक पद्धतीने तयार करते. स्वराज ७४४ एफई ट्रॅक्टरमध्ये ती सिलेंडर असून ते २००० आरपीएम गती निर्माण करतात. याशिवाय, २ व्हील ड्राइव्ह / ४ व्हील ड्राइव्ह प्रकार देखील आहे. तसेच यामध्ये ८ फॉरवर्ड आणि २ रिव्हर्स गियर बॉक्स देण्यात आले आहेत. याची किंमत सुमारे ६.९० लाख ते ७.४० लाख रुपयांपर्यंत आहे.

३) स्वराज ७३५ एफई (Swarah 735 FE)
स्वराज ७३५ एफई हा ट्रॅक्टर दिसायला अतिशय आकर्षक असून शेती कामांसाठी हा चांगला मायलेज देखील देतो. यात १८०० आरपीएम आणि २ व्हील ड्राइव्ह व्हेरियंटही देण्यात आले आहेत. यात ड्यूअल क्‍लच सोबत सिंगल डाय डिस्क फ्रिक्शन प्लेट देण्यात आली आहे. या ट्रॅक्टर मध्ये ४० एचपी आणि तुम्हाला ड्राय डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. या ट्रॅक्टरमध्ये शेतकर्‍यांना मोबाईल चार्जर, पार्किंग ब्रेक इत्यादी अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. स्वराज ७३५ एफई ट्रॅक्टरची किंमत ५.२८ ते ६.२० लाखांदरम्यान आहे.

४) महिंद्रा ४७५ डीआई एक्सपी प्लस (Mahindra 475 DI XP Plus)
विश्‍वासाचं दुसरं नाव म्हणजे महिंद्रा असे म्हटले जाते. महिंद्रा ४७५ डीआई एक्सपी प्लस हा ट्रॅक्टर सर्वाधिक लोकप्रिय ट्रॅक्टरपैकी एक मानला जातो. यात ४४ एचपी इंजिंन आणि २००० आरपीएमची गती आहे. याशिवाय ८ फॉरवर्ड + २ रिव्हर्स गीअर्स देखील यामध्ये देण्यात आले आहेत. बहुतांश शेतकरी गहू, भात आणि ऊस पिकांसाठी या ट्रॅक्टरचा वापर करतात. याची किंमत भारतीय बाजारात ६.४० ते ६.७० लाख रुपयांपर्यंत आहे.

५) महिंद्रा २७५ डीआई टीयू (Mahindra 275 DI TU)
महिंद्रा २७५ डीआई टीयू हा ट्रॅक्टर शेतीशी संबंधित सर्वात मोठी कामेही सहजतेने करू शकते. ३९ एचपीच्या या ट्रॅक्टरमध्ये २०४८ सीसीचे इंजिन असून ते २१०० आरपीएमची गती निर्माण करते. याची किंमत ५.६० लाख ते ५.८० लाख रुपयांपर्यंत आहे.

६) पॉवरट्रॅक युरो ५० (Power Track Euro 50)
पॉवरट्रॅक युरो ५० या ट्रॅक्टरमध्ये तीन सिलेंडर आणि २७६१ सीसीचे इंजिन दिले आहे. हा ट्रॅक्टर २२०० आरपीएमची गती देतो. याशिवाय यात ड्युअल आणि सिंगल क्‍लच देखील दिले आहेत. शेतकर्‍यांच्या सुरक्षेसाठी टूल टॉप लिंक, कॅनोपी, हुक, बंपर, ड्रॉबार आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. या ट्रॅक्टरची किंमत ६.९० ते ७.२५ लाखांदरम्यान आहे.

७) महिंद्रा ४७५ डीआई (Mahindra 475 DI)
महिंद्रा ४७५ डीआई या ट्रॅक्टरमध्ये इंजिन क्षमतेसाठी ४२ हॉर्सपॉवर आणि २३७० सीसी इंजिन देण्यात आले आहे. हा ट्रॅक्टर २ व्हील ड्राइव्ह प्रकार आणि ४८ लिटर इंधन टाकी क्षमतेसह येतो. हा ट्रॅक्टर मुख्यतः नांगर, कल्टिव्हेटर, रोटाव्हेटर आणि डिस्क वापरण्यासाठी वापरला जातो. तसेच या ट्रॅक्टर मध्ये ड्राय टाईप क्‍लच आणि ऑईल बेस डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. जेणेकरून शेतात सहज नियंत्रित करता येईल. याची किंमत ६.३० ते ६.६० लाखांदरम्यान आहे.

८) न्यू हॉलंड ३२३० एनएक्स (New Holland 3230 NX)
न्यू हॉलंड ३२३० एनएक्स ३ सिलेंडर आणि ३५०० सीसी इंजिनद्वारे समर्थित आहे जे २००० आरपीएम तयार करते. याशिवाय हा ट्रॅक्टर १५०० किलोग्रॅक हायड्रॉलिक सहज उचलू शकतो. याची किंमत जवळपास ५.९९ लाख ते ६.४५ लाख रुपयांपर्यंत आहे. कमी खर्चाच जास्तीत जास्त कामे करण्यासाठी या ट्रॅक्टरची ओळख आहे.

९) जॉन डिअर ५१०५ (John Deere 5105)
जॉन डिअर ५१०५ हा ट्रॅक्टर अधुनिक श्रेणीचा ट्रॅक्टर म्हणून ओळखला जातो. या ट्रॅक्टरमधये २१०० इंजिन रेटेड आरपीएम आणि २ व्हील ड्राइव्ह / ४ व्हील ड्राइव्ह प्रकार देखील दिले आहेत. त्याची इंधन टाकी क्षमता ६० लिटर आणि उचलण्याची क्षमता १६०० किलो पर्यंत आहे. याला कूलंट कूलिंग सिस्टीम आणि ड्राय टाईपचे ड्युअल एलिमेंट एअर फिल्टर देण्यात आले असून दीर्घ शेतीच्या कामासाठी त्यामध्ये सुरक्षिततेचीही काळजी घेण्यात आली आहे. या ट्रॅक्टरची किंमत ६.०५ ते ६.२५ लाखांदरम्यान आहे.

१०) महिंद्रा ५७५ डीआई (Mahindra 575 DI)
महिंद्रा ५७५ डीआई हा ४५ एचपी चा सर्वोत्तम ट्रॅक्टर आहे. यात ४ सिलेंडर आणि २७३० सीसी इंजिन देण्यात आले आहे. याशिवाय १९०० सीसी सह २ व्हील ड्राइव्ह वेरिएंट देखील देण्यात आले आहेत. हे १६०० किलोपर्यंत माल सहज उचलू शकते. यात इतरही अनेक चांगली वैशिष्ट्ये आहेत. जेणेकरून शेतकर्‍यालाही शेतीची सर्व कामे काही मिनिटांत करता येतील. याची किंमत सुमारे ६.६५ लाख ते ६.९५ लाख रुपये आहे.

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
banana tissue culture

टिश्यू कल्चरपासून केळीची लागवड; असे होतील फायदे

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट