कृषिसेवा केंद्र सुरू करायची इच्छा आहे? मग हे वाचाच

agricultural service center

औरंगाबाद : ग्रामीण भागात स्वयंरोजगाराचा एक उत्तम पर्याय म्हणून कृषी सेवा केंद्राकडे पाहिले जाते. कृषी सेवाकेंद्र सुरु करणे फारसे अवघड नसले तरी त्यात यशस्वी व्हायचे असल्यास मेहनती शिवाय पर्याय नाही. कृषिसेवा केंद्र उभारणीसाठी जागा, इमारत, पैसा या गोष्टी असणे आवश्यक आहे. कृषिसेवा केंद्र उभारण्यास किती भांडवल लागेल, कमी असणार्‍या भांडवलाची उभारणी करण्याची गरज भासल्यास ती कशाप्रकारे करावी. या संदर्भातील माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

कृषिसेवा केंद्र स्थापनेसाठी विविध परवाने आवश्यक आहेत. ते त्या-त्या संबंधित संस्थेकडून घ्यावे लागतात. या संबंधी राज्य शासनाने कायदे केलेले आहेत. कृषिसेवा केंद्र सुरू करण्याचा परवाना देण्याचा अधिकार कृषि विकास अधिकारी यांना देण्यात आलेला आहे. या परवान्याबरोबर महाराष्ट्र शॉप अ‍ॅक्ट अन्वये कृषिसेवा केंद्राची नोंदणी करून घ्यावी लागते. कृषिसेवा केंद्रांना निविष्ठा पुरवठा करणार्‍या संस्थाचे उदा. खते, कीटकनाशके व बुरशीनाशाके, शेतीची अवजारे, बियाणे, उत्पादक संस्था इत्यादिंचे प्रिंसिपल प्रमाणपत्र (अधिकृत विक्रेते म्हणून) मिळवावे लागते. दर तीन वर्षांनी परवान्याचे नुतणीकरण करणे आवश्यक असते.

राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत (निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग) या कृषिसेवा केंद्राची वेळोवेळी तपासणी केली जाते. त्या वेळी खते, बी-बियाणे अथवा पीकसंरक्षके (किटक व रोगनाशके) यांची प्रत नियमांना धरून व वेष्टनावर नमूद केल्याप्रमाणे असणे गरजेचे असते. अन्यथ: परवाना जप्तीपासून तर थेट काही शिक्षा होण्यापर्यंत कायद्याच्या तरतूदी आहेत.

कृषिसेवा केंद्र स्थापन करताना जागेची निवड काही बाबींचा विचार करणे आवश्यक असते. जसे की, कृषिसेवा केंद्र नियोजित स्थळी मध्यवर्ती ठिकाणी असावे. गावामधील इतर सहयोगी संस्था उदा. विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, ग्रामीण बँक, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक इत्यादिंची कार्यालये जवळ असावी. शक्यतो शेतकर्‍यांच्या जाण्या-येण्याच्या मार्गावर कृषिसेवा केंद्र असावे.

Exit mobile version