नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने सेंद्रीय शेती बद्दल बोलतांना दिसत आहेत. सेंद्रीय शेती काळाची गरज असून जास्तीत जास्त शेतकर्यांनी याकडे वळावे, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशिल आहे. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही भाष्य केले आहे.
शेतीपध्दतीत बदल करुन शेतकर्यांनी उत्पादन वाढवणे तर गरजेचे आहे शिवाय काळाच्या ओघात जो खर्च होत आहे त्यावर देखील अंकूश लादणे गरजेचे आहे. यासाठी सेंद्रीय शेती अत्यंत फायदेशीर असल्याचे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले आहे.
इगतपुरी घोटी येथील ए. एस.अॅग्री व कल्याणी वेअर हाऊसला राज्यपालांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी सेंद्रीय शेतीबाबत भाष्य केले. वातावरणातील बदलामुळे पिकांचे नुकसान होत आहे. शिवाय केवळ उत्पादन वाढून उपयोग नाही तर त्याबरोबर दर्जाही वाढणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
राज्यात अल्पभूधारक शेतकर्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान निर्माण झाले तरी सर्वसामान्य शेतकर्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. कमी जागेत सेंद्रिय पध्दतीने जास्त उत्पादन घेण्याचा ए. एस.अॅग्री समुहाने उभारलेला प्रकल्प उल्लेखनीय असल्याचे राज्यपाल म्हणाले.
थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील केळी हे प्रमुख फळपिक असून सद्यस्थितीत तापमान कमी – कमी होत…
सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर
जळगाव : शेतीच्या सातबारा पुरूषांच्या नावे असतो; मात्र शेतात सर्वाधिक काम महिला करत असतात. जेव्हा पुरूषांच्या…
रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?
नागपूर : संपूर्ण जगात रबरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. वाहनांचे टायर, शूज, इलेक्ट्रिक उपकरणे,…
नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा
पुणे : शेतकर्यांसाठी नोव्हेंबर महिना खूप महत्त्वाचा आहे. रब्बी पिकांची पेरणी ऑक्टोबरच्या मध्य ते नोव्हेंबर…
मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन
पुणे : भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी मिरचीचे नवीन वाण विकसित केले आहे. या वाणास…
या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर
नंदूरबार : नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मका, सोयाबीन, ज्वारी, लाल मिरची तेजीत आहे. या…