नाशिक : छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात शेतकर्यांची बिकट अवस्था झाली आहे. आपला देश कृषीप्रधान देश असल्याने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे. याकरिता शेतकर्यांनी पिकविलेल्या शेतमालाला योग्य किंमत मिळावी, एकरी लागणारी ऊस उत्पादन खर्च पकडून शेतकऱ्याला आर्थिक मदत करण्यात यावी, यासह ९ मागण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आडगाव चे शेतकरी बाळासाहेब कोळसे यांनी तब्बल तीन हजार ४०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे.
बाळासाहेब कोळसे यांनी १३ ऑक्टोबर रोजी अहमदनगर येथून सायकल प्रवासाला सुरुवात केली आतापर्यंत त्यांनी २५ जिल्हे व तीन हजार ४०० किलोमीटर प्रवास पूर्ण केला आहे या प्रवासाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांना भेटून करणार आहेत.
कोळसे म्हणतात सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत चालली असून शेतकऱ्यांची दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी गटातटाचे राजकारण सोडून सर्वच पक्षांनी व पदाधिकार्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
या आहेत बाळासाहेब कोळसे यांच्या मागण्या :
- – शेतकऱ्यांना कमी पडल्यावर मालाची किंमत ठरवता यावी
- – सरकारकडून देण्यात येणारी मदत उत्पादनखर्च पकडून देण्यात यावी
- – शेतकऱ्यांच्या शेतमालाला लागणारा उत्पादन खर्च पकडून हमीभाव द्यावा
- – सर्व शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करण्यात यावे
- – नोकर भरतीमधील भ्रष्टाचार करण्यात यावा
- – शेतकऱ्यांच्या होणार्या आत्महत्या थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात यावे
- – शेतकऱ्यांच्या होणार्या आत्महत्या करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या
- – कर्जबाजारी तणावग्रस्त शेतकऱ्यांना आत्महत्या पासून वाचण्यासाठी शासनाकडून हेल्पलाइन सुरू करण्यात यावी
- – विज पंपासाठी मोफत वीज देण्यात यावी