नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेल्या पावसाचे आगमन झाल्यामुळे खरीप पिकांच्या पेरणीला वेग आला आहे. पारंपारिक पिकांव्यतिरिक्त किंवा त्या सोबत अनेक शेतकरी अन्य पिके किंवा फळभाज्यांचे उत्पादन घेतात. जुलै महिन्यात काही पिके किंवा फळभाज्या अशा आहेत, ज्या माध्यमातून हमखास भरघोस उत्पादन मिळू शकते. याच पिंकांची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. ज्याची लागवड करून शेतकरी भरपूर नफा कमवू शकतो.
भात व तूर : जुलै महिना भातशेतीसाठी अत्यंत फायदेशीर ठरणारा असतो. याशिवाय या महिन्यात तूर पेरणी करून शेतकर्यांना चांगला नफाही मिळू शकतो.
टोमॅटो, वांगी आणि मिरची : टोमॅटो लागवडीसाठी जुलै हा सर्वात योग्य महिना मानला जातो. त्याचबरोबर वांगी आणि मिरचीची लागवडही या हंगामात शेतकर्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
भोपळा, काकडी आणि करवंद : भोपळा, काकडी, लौकी यांना बाजारात मागणी कायम आहे. या भाज्यांची पिके पावसाळ्यात चांगली येतात. या तीन भाज्यांची लागवड करून शेतकर्यांना कमी वेळेत अधिक नफा मिळू शकतो.
हे देखील वाचा : पेरणीला पोषक वातावरण, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना ‘हा’ आहे महत्त्वाचा सल्ला