बायोगॅससाठी अनुदान हवे असल्यास हे नक्की वाचा…

नागपूर : ग्रामीण भागात बायोगॅस बांधकाम केल्यास केंद्र शासनाच्या नवीन आणि नवीकरणीय मंत्रालयामार्फत अनुदान दिले जाते. बायोगॅस बांधकामासाठी लाभार्थीची आर्थिक कुवत नसेल तर त्यासाठी राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांकडून कर्जपुरवठा केला जातो. मिळणारी अनुदानाची रक्कम लाभार्थीच्या कर्जखाती जमा केली जाते. याशिवाय बायोगॅसचा स्वयंपाकाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापर केल्यास (उदा. – इतर ऊर्जा साधनांचा वापर कमी करून डिझेल बचत करणे, जनरेटर, रेफ्रिजरेटर यांच्या वापरासाठी बायोगॅसचा वापर केल्यास) प्रति संयंत्रास ५००० रुपये अनुदान देण्यात येते.

आपल्याला ज्या प्रकारचा बायोगॅस बांधायचा आहे, त्याप्रमाणे त्याचा खर्च लक्षात घ्यावा लागेल. राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही स्वयंसेवी संस्थांचा सहभाग असतो. बायोगॅस योजनेतील अद्ययावत माहितीसाठी आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी संपर्क साधू शकता.

दारिद्र रेषेखालील कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी राबविण्यात येणारी प्रमुख स्वंयरोजगार योजना आहे. केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयामार्फत राबविली जाते. केंद्र शासनाच्या २० कलमी कार्यक्रमांतर्गत समाविष्ट योजना. ही योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे. ग्रामीण भागात बायोगॅस संयंत्रांच्या उभारणीतून स्वयंपाकासाठी इंधन व सेंद्रीय खत पुरविणे आदींचा यात समावेश होतो.

उद्दीष्टये

ग्रामीण भागातील स्त्रियांचे जीवनमान सुधारणेबायोगॅस संयंत्रांस शौचालय जोडणीतून सर्वसाधारण स्वच्छता तसेच पर्यावरण संतुलन राखणे

अनुदान वितरण

सर्वसाधारण गटासाठी- ९ हजार रुपये
अनुसूचित जाती व जमाती- ११ हजार रुपये शौचालय जोडणी- १ हजार २०० प्रति संयंत्र

संपर्क

जिल्हा स्तरावर: कृषी विकास अधिकारी तालुका स्तरावर: गट विकास अधिकारी/ कृषी अधिकारी /विस्तार अधिकारी(कृषी)

उद्दिष्टेदारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांना बँकेचे अर्थसहाय्य व शासनाचे अनुदान या दोन्हीद्वारे कायमस्वरूपी उत्पन्न निर्माण करणाऱ्या साधनांचा पुरवठा करून दारिद्र रेषेच्यावर आणणे, हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.उपक्रम या कुटुंबांना सामाजिक कार्य प्रवणता, प्रशिक्षण आणि क्षमता वृद्धी करणे या प्रक्रियेचा अवलंब करून स्वसहाय्य गटांमध्ये संघटित करण्यात येते. स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनादारिद्र रेषेखालील कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी राबविण्यात येणारी प्रमुख स्वंयरोजगार योजना आहे.

अधिक माहितीसाठी : https://rdd.maharashtra.gov.in

Exit mobile version