मुंबई : केंद्र सरकारने पंतप्रधान किसान योजनेच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे. मोदी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत रेशन कार्ड अनिवार्य केले आहे. आता त्याशिवाय पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकर्यांनी योजनेशी संबंधित एजन्सीकडे तातडीने नियमातील बदलाच्या अनुषंगाने रेशनकार्ड ची पुर्तता करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय वार्षिक ६,००० रुपयांचा हप्ता मिळणार नाही.
रेशन कार्ड क्रमांक अनिवार्य
पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत नवीन नोंदणीवर रेशन कार्ड क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे. एकदा रेशन कार्ड क्रमांक मिळाल्यानंतर कुटुंबातील एका सदस्याला किसान सन्मान निधी मिळेल. रेशनकार्ड सादर न केल्यास शेतकर्यांना पुढचा हप्ता मिळणार नाही.
सत्यप्रती सादर करण्याची आवश्यकता नाही
पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत नोंदणीवर रेशन कार्ड क्रमांक द्यावा लागेल. त्याचबरोबर रेशनकार्ड ची पीडीएफही अपलोड करणे आवश्यक आहे. मात्र आता या कागदपत्रांच्या सत्यप्रती सादर करण्याची अट रद्द करण्यात आली आहे. यामुळे यापुढे आधार कार्ड, बँक पासबुक, खतावनी आणि जाहीरनाम्याच्या सत्यप्रती सादर करण्याची आवश्यकता नाही. आता या कागदपत्रांच्या केवळ पीडीएफ फाइल्स तयार करून पोर्टलवर अपलोड कराव्या लागतात.