मुंबई : पशूपालनाचा व्यवसाय अधिक वाढवण्याच्या उद्देशाने पशूसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय आणि वित्तियसेवा विभाग यांच्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) योजना राबविली जात आहे.
विनातारण १ ते ३ लाखापर्यंतचे कर्ज
या मोहिमेच्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्ड घेतले तर पशूपालकास १ लाखापर्यंतचे कर्ज मिळणार आहे. जर पशूपालक हा शेतकरी सहकारी दूध सोसायटी, दूधसंघ, दूध उत्पादक कंपनी या कोणाशीही संलग्न असला तरी आणि यापैकी कोणीही त्याच्या कर्ज परतफेडीची जबाबदारी घेत असेल तर ३ लाखापर्यंत तारणाशिवाय कर्ज मिळणार आहे. यामाध्यमातून पशूंची खरेदी नाही तर केवळ व्यवस्थापन केले जावे म्हणून आहे.
हे देखील वाचा : शेतकऱ्यांनो अन्न प्रक्रिया उद्योगासाठी १० लाखांपर्यंत अनुदान हवे असेल तर हे वाचा…
किसान क्रेडिट कार्ड या योजनेअंतर्गत पशूपालनासाठी व्यवस्थापन करता यावे म्हणून १ ते ३ लाखापर्यंतचे कर्ज मिळणार आहे. १५ फेब्रुवारीपर्यंतच पशूपालकांना या योजनेत लाभ घेता येणार आहे. त्यामुळे राष्ट्रव्यापी मोहिमेत सहभाग नोंदवण्याचे अवाहन पशूसंवर्धन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.