लातूर : तुरीला हमीभावापेक्षा कमी भाव असल्याने उशिरा का होईना नाफेडच्यावतीने महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्यामार्फत (Maharashtra State Co-operative Marketing Federation) खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. याकरिता नाव नोंदणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. खरेदी केंद्रावर ६ हजार ३०० रुपये क्विंटलचा दर ठरवण्यात आला आहे. पण बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी दर असल्याने शेतकरी पणन महासंघाच्या केंद्रावरच विक्री करण्यास उत्सूक आहे.
राज्यभरात १८६ हमीभाव केंद्रावर तुरीची (Tur Dal) खरेदी केली जाणार आहे. सध्या प्रत्यक्ष खरेदीला सुरवात झाली नसली तरी आवश्यक त्या प्रक्रिया पार पाडली जात आहे. शेतकऱ्यांना जवळच्या खरेदी केंद्रावर नाव नोंदणी करता येणार आहे. नाव नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १ जानेवारीपासून खरेदीला सुरवात होणार आहे. यासाठी खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी आवश्यक असणारी प्रक्रिया पार पाडली जात आहे. सुरवातील शेतकर्यांना नाव नोंदणी करावी लागणार याकरिता ७/१२ उतारा, ८ अ, पिकपेरा आणि बँकेचे पासबुकची झेरॉक्स ही खरेदी केंद्रावर जमा करावी लागणार आहे.
हे देखील वाचा :