मुंबई : महिला शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात आगामी वर्ष हे महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. उत्पादन वाढीच्या अनुशंगाने राज्य सरकारच्यावतीने वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. आता यामध्येच महिला शेतकऱ्यांना अधिकची सुट देण्यात येणार आहे. कृषी योजना आणि अन्नधान्य प्रक्रिया उद्योगामध्ये महिला शेतकऱ्यांसाठी ३० टक्के निधी हा राखीव ठेवला जाणार आहे. यामुळे महिला सक्षमिकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले जाणार आहे.
मोदी-ठाकरे सरकार एकत्र!
केंद्र आणि राज्य सरकारमध्ये काहीही मतभेद असले तरी मात्र, शेतकर्यांच्या मदतीच्या दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकार हे एकत्र येत आहे. आतापर्यंत अवकाळी, चक्रीवादळ यामुळे हंगामी पिकांसह फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या दरम्यान, केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे मिळूनच मदतीची भूमिका ठरवतात. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळेही मोठे नुकसान झाले आहे. कृषि विभागाकडून शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला आहे. त्याची पाहणी करुन लवकरच मदत जाहीर केली जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
हे देखील वाचा :
- 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप हवाय; असा करा ऑनलाइन करा अर्ज
- शेतकर्यांना ड्रोन खरेदीसाठी मिळणार अनुदान; जाणून घ्या काय आहे मोदी सरकारची योजना?
- कृषी विभागाच्या योजनांसंदर्भात महाबीटीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; वाचा सविस्तर
- शेतात अपघात झाल्यास शेतकऱ्यांना मिळणार ५ लाख रुपये, ‘या’ राज्यात आहे योजना
- शेतकऱ्यांनो शेतात लावा नेट हाऊस, उत्पादनात होईल वाढ, सरकारकडूनही मिळेल 50% अनुदान