नवी दिल्ली : पीएम किसान योजनेंतर्गत मिळणार्या १०व्या हप्त्याची शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. पीएम किसान सन्मान निधी २०२१ योजनेचा जारी करण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्याचा मेसेजही लाभार्थ्यांना पाठवण्यात आला आहे. शेतकर्यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १२ वाजता पीएम किसान योजनेअंतर्गत १० वा हप्ता जारी करतील. या दिवशी पीएम मोदी शेतकरी उत्पादक संघटनांना इक्विटी अनुदानही जारी करतील, अशीही माहिती या मेसेजमध्ये देण्यात आली आहे.
पीएम किसान योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत केंद्र सरकारने ११.१७ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली आहे. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये शेतकर्यांच्या खात्यावर जमा करते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतंर्गत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आतापर्यंत ९ हफ्ते दिले आहेत. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना २ हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. दहाव्या हप्त्यासोबतच नवव्या हप्त्याचे पैसे न मिळालेल्या शेतकर्यांनाही दोन हफ्त्याची रक्कम मिळेल. त्यामुळे या शेतकऱ्यांना एकूण चार हजार रुपये मिळणार आहेत.
शेतमाल तारण योजनेचा लाभ कसा घ्यावा? वाचा सविस्तर
शेतात सेल्फी काढा अन् ११ हजार रुपये मिळवा!
या योजनेंतर्गत शेतकर्यांना २ कोटींपर्यंत कर्ज
शेततळ्यासाठी १०० टक्के अनुदान हवेय, मग हे वाचाच
अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबास या योजनेअतंर्गत मिळते २ लाखांची मदत
शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्या अन् व्यापार्यांकडून होणारी आर्थिक लूट टाळा
असे चेक करा तुमचे नाव
पीएम किसान योजनेसाठी शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी किंवा त्यामध्ये काही बदल करण्यासाठी पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवरून करता येणार आहे. यासाठी प्रथम https://www.pmkisan.gov.in/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइटच्या होम पेजवर, फार्मर्स कॉर्नर उजव्या बाजूला मोठ्या अक्षरे लिहिलेले आहे. आपले नाव सूचीमध्ये आहे की नाही हे आपण पाहू इच्छित असल्यास आपल्याला लाभार्थी यादीवर क्लिक करावे लागेल. यानंतर आपण आपले नाव राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गाव यांचे नाव भरून तपासू शकता.