• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

गव्हावरील तांबेरा रोगाचे असे करा व्यवस्थापन

Tushar BhambarebyTushar Bhambare
in पीक व्यवस्थापन
December 23, 2021 | 10:46 am
gahu-tambera-rog

गव्हावरील तांबेरा रोग

औरंगाबाद : रब्बी हंगामात गव्हाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गव्हाचे उत्पादन तर वाढले असले तरी वातावणातील बदलामुळे तांबोरा रोगाचे प्रमाण हे वाढत आहे. गव्हावर तांबोरा रोगाचा अधिक प्रादुर्भाव झाल्यास पिकाची वाढ तर खुंटतेच पण वार्षिक उत्पन्न हे देखील घटते. त्यामुळे तांबोरा रोगाचे नियंत्रण कसे करावे याची माहिती शेतकर्‍यांना असणे गरजेचे आहे.

तांबेरा रोगाचे वेगवेगळे प्रकार आहेत. हा रोग पानावर, खोडावर, ओंबीवर आढळतो. गव्हावर खोडावरील काळा तांबेरा, पानावरील नारंगी तांबेरा येतो. पानावर सुरवातीला लहान तपकिरी ठिपके दिसतात आणि त्यातूनच विटकरी रंगाची बिजाणू बाहेर पडतात. लांबट, गोल ठिपके दोन शिरांमध्ये वाढतात. अनेक ठिपके मिळून सर्वच पान व्यापून जाते. पानाप्रमाणेच खोडावर, ओंबीवर व ओंबीतील दाण्यावरही रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. हे काळे ठिपके खोडावर लांबट व स्पष्टपणे एकमेकांत मिसळलेले आढळतात, म्हणून त्याला खोडावरील काळा तांबेरा म्हणतात.

गव्हाच्या पानावरील नारंगी तांबेरा या रोगाची लागण जानेवरी फेब्रुवारी महिन्यात अधिक प्रमाणात दिसून येते. रोगाची तीव्रता जास्त असल्यास खोडावरही लक्षणे दिसून येतात. पानावर पिवळे गोलाकार ठिपके तर त्याचे रुपांतर पुन्हा बारीक मोहरीच्या आकाराच्या फोडात होते. याच फोडातून नारंगी रंगाची बिजाणूची भुकटी बाहेर येते. थंड हवामान व आर्द्रता जास्त दिवस टिकून राहिल्यास रोगाचा प्रसार झपाट्याने होतो.

तांबोरा रोगाचे असे व्यवस्थापन

गव्हाची पेरणी करताना शक्यतो कृषी विद्यापीठाने वाणांचाच वापर करावा. रोगप्रतिकार वाणांमध्ये एच .डी – २१८९, परभणी – ५१, एच डी.एम – १५५३ (सोनालीका), एच .डी – ४५०२ या वाणांचा वापर फायदेशीर ठरतो. खताचा डोस देताना नत्र, स्फुरद, यांचे प्रमाण २:१ ठेवावे. पिकास पाणी देतान बेताने व गरजेपुरतेच द्यावे. रोगाचे लक्षण दिसून येताच २ ते २.५ ग्रॅम डायथेन एम- ४५ प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास शेतकर्‍यांचा फायदा होतो.

हे देखील वाचा :

  • थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?
  • मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन
  • फायद्यासाठी रब्बी हंगामातील चारापिके लागवडीचे तंत्र जाणून घ्या
  • सुर्यफुलच्या भरघोस उत्पादनासाठी ही माहिती तुमच्यासाठी ठरेल फायदेशिर
  • हरभरा पिकाच्या बंपर उत्पादनासाठी ‘हा’ आहे तज्ञांचा सल्ला
Tags: Wheatगहूतांबेरा रोग
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
women-in-agriculture-india

महिला शेतकऱ्यांसाठी ३० टक्के निधी राखीव

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट