बायोटेक्नॉलॉजी मध्ये करिअर कारायचे आहे?

- Advertisement -

पुणे : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जैवतंत्रज्ञान (बायोटेक्नॉलॉजी : Biotechnology) ही जीवशास्त्र विषयामध्ये तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेली अलीकडच्या काळात निर्माण झालेली शाखा आहे. यात बी.एस्सी., एम.एस्सी., बी.टेक., एम.टेक. आणि पी.एचडी.च्या स्वरुपात शिक्षणाची संधी आहे. या विषयामध्ये सागरी जैव तंत्रज्ञान, कृषी जैवतंत्रज्ञान, लाल जैव तंत्रज्ञान, वैद्यकीय जैव तंत्रज्ञान, श्‍वेत जैव तंत्रज्ञान आणि औद्योगिक जैव तंत्रज्ञानाचा समावेश होतो.

विविध आजारांवरील लसी व निदान, प्रतिजैविके निर्माण, संशोधन वैद्यकीय चाचण्या, उतिसंवर्धन, संकरित बियाणे, जैविक खते, जैविक कीटकनाशके, जनुकीय सुधारित पिके, अन्न प्रक्रिया उद्योग, औद्योगिक एन्झाइम्स, स्टेम सेलनिर्मिती, डेटाबेस सेवा, सॉफ्टवेअर, बायोटेक सॉफ्टवेअर सेवेमध्ये करिअर करण्यासाठी बायोटेक्नोलॉजी या शाखेचा उपयोग होतो. अलीकडच्या काही वर्षात भारतामध्ये बायोटेक्नोलॉजीच्या विविध क्षेत्रांमधील काम करणार्‍या कंपन्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.  यामुळे बायोटेक्नोलॉजी (Career in Biotechnology) या शाखेकडे वळणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येतही मोठी वाढ दिसून येते.

जैवतंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून बीएस्सी किंवा एमएस्सी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. प्रक्षेत्र भेटीद्वारे बीएस्सी/ एमएस्सी झालेले विद्यार्थी खासगी संस्थांमध्ये काम करू शकतात. बायोटेक/अप्लाइड लाइफ सायन्समध्ये मास्टर डिग्री करणारे विद्यार्थी अध्यापन, संशोधन, विस्तार क्षेत्रात नोकरी करू शकतात.जैवतंत्रज्ञानामध्ये पदवीनंतर पदव्युत्तर पदवी घेऊन विक्री क्षेत्रात काम करू शकतात. संशोधक म्हणून काम करण्यासाठी पदव्युत्तर पदवी गरजेची असते. महाराष्ट्र शासनाच्या नूतन आर्धीनियामानुसार माध्यमिक शाळांमध्ये जैवतंत्रज्ञान पदवीधारक उमेदवार माध्यमिक शिक्षकाच्या नोकरीसाठी पात्र ठरणार आहेत. कृषी विद्यापीठांद्वारे केलेल्या बी. टेक./ एम.टेक. पदवीधर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सरकारी सेवेमध्ये रुजू होता येते.

हे देखील वाचा